नांदेड : –ब्रह्मकुमारीज कृषी एवं ग्रामविकास प्रभाग व ओडिसा सरकार, कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नैसर्गिक जैविक योगीक शेतीचे प्रशिक्षण देण्यासाठीमालेगावचे भूमिपुत्र कृषीभूषण, मास्टर ट्रेनर भगवान भाईजी इंगोले, यांची. ओडिसा राज्यातील ICR भाकृ अनुप केंद्रीय चावल अनुसंधान संस्थान, कटक. ओडिसा युनिव्हर्सिटी ऑफ एग्रीकल्चर भुवनेश्वर. केंद्रापाडा ,येथे दि.१४/९/२०२५ ते १८/९/२०५ पर्यंत प्रशिक्षण देण्यासाठी निवड झाली आहे.
निवडीचे सर्व स्तरावरून त्यांचे स्वागत होत आहे.
सात दिवसीय प्रशिक्षणामध्ये शाश्वत योगिक शेतीचे महत्व, पर्यावरणाचे संवर्धन करून नैसर्गिक पद्धतीने कमी खर्चाची गौ आधारीत शेती करणे, शेती मध्ये लागणाऱ्या जैविक निविष्ठा बांधावरच बनवणे जीवामृत , दशपर्णी अर्क, गौकर्पा अमृत, हर्बल कुणापजल, निमअर्क , ऑरगॅनिक डी, ए, पी, प्रोम सारखे खत , बणवने , शेतकऱ्यांचे गट, कंपनीच्या माध्यमातून, प्रक्रिया युनिट,पॅकिंग, ऑरगॅनिक सर्टिफिकेशन महत्व , मार्केटिंग करणे , इत्यादी विषयांवर प्रशिक्षण देणार आहेत.
