नांदेड(प्रतिनिधी)-जिल्हा परिषदेतील अध्यक्ष पदाची अधिसुचना जारी झाली आहे. त्यामध्ये नांदेड जिल्हा परिषदेसाठी अध्यक्ष पदाची जागा नागरीकांचा मागासप्रवर्ग (महिला) यांच्यासाठी राखीव झाला आहे.
ग्राम विकास विभागाने महाराष्ट्र जिल्हा परिषदा अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समिती सभापती व उपसभापती पदांचे आरक्षण व निवडणुक नियम 1962 प्रमाणे ही अधिसुचना जारी केली आहे.
राज्यातील 34 जिल्ह्यांमधील अध्यक्ष पदाचे आरक्षण पुढील प्रमाणे आहे. ठाणे-सर्वसाधारण महिला, पालघर-अनुसूचित जमाती, रायगड-सर्वसाधारण, रत्नागिरी-नागरीकांचा मागासप्रवर्ग महिला, सिंधदुर्ग आणि नाशिक-सर्वसाधारण, धुळे-नागरीकांचा मागासप्र्रवर्ग महिला, नंदुरबार-अनुसूचित जमाती, जळगाव-सर्वसाधारण, पुणे-सर्वसाधारण, सातारा-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, सांगली-सर्वसाधारण महिला, सोलापूर-नागरीकांचा मागास प्रवर्ग, कोल्हापूर-सर्वसाधारण महिला, छत्रपती संभाजीनगर-सर्वसाधारण, जालना-नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, बीड-अनुसूचित जाती महिला, परभणी-अनुसूचित जाती, हिंगोली-नागरीकांचा मागास प्रवर्ग, नांदेड-नागारीकांचा मागास प्रवर्ग महिला, धाराशिव आणि अमरावती सर्वसाधारण महिला, अकोला आणि वाशिम-अनुसूचित जमाती महिला, बुलढाणा आणि यवतमाळ-सर्वसाधारण, नागपूर-नागरीकांचा मागास प्रवर्ग, वर्धा-अनुसूचित जाती, भंडारा-नागरीकांचा मागास प्रवर्ग, गोदिंया-सर्वसाधार महिला, चंद्रपुर-अनुसूचित जाती महिला, गडचिरोली-सर्वसाधारण महिला आदेश शासनाचे उपसचिव व.मुं.भरोसे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाला आहे.
नंदुरबार, धुळे, नाशिक आणि आहिल्यानगर या चार जिल्ह्यांमध्ये पंचायत समितीच्या सभापती पदाच्या 3 जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. तसेच या चार जिल्हयामध्ये सभापतींच्या 3 जागा अनुसूचित जमातीच्या महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. हे पद एका सभापतीला अडीच वर्ष भोगता येईल. ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, अमरावती आणि गडचिरोली या जिल्ह्यांमधये पंचायत समिती मधील सभापती पदांची संख्या अनुसूचित जमातीसाठी 11 आणि अनुसूचित जमाती महिलांसाठी 13 अशी निश्चित करण्यात आली आहे.
वाचकांच्या सोयीसाठी राज्य शासनाची अधिसुचना पीडीएफ संचिकेमध्ये बातमीसह जोडली आहे.
अधिसूचना दि.09.09.2025 म जि प (अध्यक्ष्य उपाध्यक्ष्य सभापती ) आरक्षणाबाबत
