नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील अत्यंत नामांकित असलेल्या न्यु लाहोटी मेडीकल आणि सर्जिकल शॉपवर पोलीसंानी डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गोळ्यांची मागणी केली आणि त्या दुकानदाराने ते औषध त्याला दिले. तपासणी केली असता असा भरपूर साठा तेथे मिळाला. त्याच्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे.
दि.10 सप्टेंबर रोजी अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त अ.तु.राठोड, पोलीस उपनिरिक्षक पंकज इंगळे, रुपेश दासरवाड, प्रदीप खानसोळे हे न्यु लाहोटी मेडिकल ऍन्ड सर्जिकल शॉप डॉक्टरलेन येथे गेले आणि डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय देता येत नाही अशा गोळ्यांची मागणी केली. लाहोटी मेडिकलने त्या गोळ्या दिल्या.
यापुर्वी सुध्दा या पथकाने शहरातील न्यु भारत मेडिकल स्टोअर्स इतवारा, जोशी मेडीकल इतवारा, एस.आर.मेडिकल अबचलनगर, साईबाबा मेडिकल लोहारगल्ली, आमेना मेडिकल महेबुबनगर, पबितवार मेडिकल गुरुद्वाराजवळ, खालसा मेडिकल गुरुद्वाराजवळ, न्यु लाहोटी मेडिकल गुरुद्वाराजवळ, सचखंड मेडिकल अबचलनगर, संत जीवन मेडिकल नगिनाघाट, आशिर्वाद मेडिकल चिखलवाडी यांच्याविरुध्द सुध्दा अशी कार्यवाही केली आहे.
पोलीस विभागाने जनतेला आवाहन केले आहे की, जिल्ह्यामध्ये कोणत्याही औषधी मेडिकल तसेच नशेच्या प्रतिबंधीत औषधी गोळ्या विक्री होत असल्याचे दिसले तर त्याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी.तसेच विशेष पथकातील पोलीस उपनिरिक्षक पंकज इंगळे यांचा मोबाईल क्रमांक 7972837836 यावर माहिती द्यावी. अशी माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.
शहरातील मेडिकल विरुध्द पोलीसांची कार्यवाही
