नांदेड- बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत सोमवार 8 सप्टेंबर रोजी जिल्हास्तरीय समुदाय आधारीत संस्थेतील संचालक मंडळांना तांत्रिक सहाय्य देण्यासाठी (TSA)-Palladium Consulting India Pvt.Ltd व जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प नांदेड यांच्यामार्फत एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. लातूर विभागीय अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी भास्कर कोळेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून प्रशिक्षणाची सुरूवात करण्यात आली. प्रास्ताविकात भास्कर कोळेकर यांनी स्मार्ट प्रकल्पातील Palladium चे तांत्रिक सहाय्य याबाबतची माहिती दिली.
या प्रशिक्षणास प्रशिक्षक म्हणून हनमंत आरदवाड, Access to finance and procurement associate, Latur (TSA)-Palladium Consulting India Pvt.Ltd संस्थेकडून यांनी विविध समुदाय आधारीत संस्थाच्या पिक पद्धती, मालाची खरेदी विक्री प्रक्रिया, निर्यातीबाबत प्रशिक्षणार्थीशी सहभागी तत्वावर सहभाग नोंदवून माहिती सादर केली. मंगेश लांबाडे Agri Business Associate यांनी मशिनरी युनिट मधील अन्न सुरक्षा, मानके याबाबत माहिती दिली. तर स्मार्ट प्रकल्पाचे नोडल अधिकारी अनिल शिरफुले यांनी नांदेड जिल्ह्यातील स्मार्ट प्रकल्पाची सद्यस्थिती बाबतची माहिती दिली.
या प्रशिक्षणास जिल्ह्यातील सर्व समुदाय आधारीत संस्थेचे संचालक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. 22 समुदाय आधारित संस्थेमधील प्रत्येकी 5 संचालक या कार्यशाळेस उपस्थित होते. शेवटी अर्थशास्त्रज्ञ राहूल लोहाळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी श्रीमती दिपा भालके, रामप्रभु कोरके, राजाभाऊ चौडेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
