नांदेड(प्रतिनिधी)-साईबाबा कमान ते दुधडेअरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. साईबाबा कमानीच्या मजबुतीसाठी तयार करण्यात आलेला एक खांब अज्ञात वाहनाने तोडून नुकसान पण केलेली आहे.
साईबाबा कमान ते दुध डेअरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक जागी अतिक्रमण होत आहे. त्याकडे महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष सुरू आहे. आजच या अतिक्रमणांनावर कार्यवाही केली नाही तर पुढे हे अतिक्रमण काय होतील., त्याचा त्रास सर्वसामान्य नागरीकांना, भुखंडधारकांना होईल. सोबतच, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे प्रशासनाने आजच या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. सोबतच साईबाबा कमानीच्या मजबुतीसाठी त्या कमानीच्या दोन्ही बाजुंना दोन खांब लावण्यात आले होते. त्यातील एक खांब कोणी अज्ञात वाहनाने तोडून टद्याकला आहे. त् यामुळे कमानीच्या मजबुतीवर सुध्दा प्रश्न उभा झत्तला आहे. मनपा प्रशासनाने याबाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी या भागातील नागरीक करत आहेत.

