नांदेड,(प्रतिनिधी)-काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्री गणरायांचे विसर्जन समाप्त झाले पण या विसर्जनात एक विघ्न सुद्धा गाडेगावच्या उबाळे कुटुंबीयांना आले. गोदावरी नदीत गणेश विसर्जन करण्यासाठी गेलेले अनुक्रमे 17 आणि 18 वर्षाचे दोन चुलत बंधू पाण्यात बुडून गेले आहेत.
आता सकाळी बातमी दिली पर्यंत ते उबाळे बंधू सापडले नव्हते.काल श्री गणेश विसर्जन सोहळा पार पडताना भक्तांनी प्रशासनाने दिलेल्या सूचना बहुतांश पाळल्या डीजे वाजवले नाहीत, मोठे गणपती वेगळीकडे वळवण्यात आले आणि छोटे छोटे गणपती पारंपारिक विसर्जन घाटांवर जात होते.
नांदेड तालुक्यातील गाडेगाव येथे गणपती विसर्जनाची उत्साहात सुरु योगेश गोविंदराव उबाळे (१७) आणि बालाजी कैलास उबाळे(१८) हे दोघे चुलत बंधू सायंकाळी ६.३० वाजता गणपती विसर्जनासाठी गोदावरी नदीपात्रात उतरले आणि दुर्दैवाने पाण्यात बुडाले आहेत. एन डी आर एफ ची टीम, पोलीस,जीव रक्षक दल या युवकांचा शोध घेत होते पण आज पहाटे वृत्त प्रसिद्ध करीपर्यंत तरी या दोन्ही युवकांचा पत्ता लागला नव्हता. नांदेड ग्रामीण ऑईलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार गजानन तेलंग या घटनेचा मागोवा घेत आहेत.
