नांदेड महानगर मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर 

नांदेड – मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या आदेशावरून नांदेड महानगर मराठी पत्रकार संघाची सन २०२५- २६ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

 

मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या आदेशावरून सरचिटणीस प्रा. सुरेश नाईकवाडे यांनी बुधवार दि.३ सप्टेंबर रोजी

नांदेड महानगर मराठी पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर केली असून महानगराध्यक्षपदी रविंद्र संगनवार तर कार्याध्यक्षपदी गजानन कानडे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. उपाध्यक्ष – किरण कुलकर्णी, उपाध्यक्ष –

प्रशांत गवळे, उपाध्यक्ष – आनंद कुलकर्णी, उपाध्यक्ष –

सुरेश काशीदे, महानगर सरचिटणीस – सुनिल पारडे, कोषाध्यक्ष – मारुती सवंडकर, संघटक – प्रल्हाद लोहेकर, समन्वयक – स.रविंद्रसिंघ मोदी,महानगर सहसचिव –

कंथक सूर्यतळ, सहसचिव –

मिर्झा आझम बेग मेहमूद बेग, प्रसिध्दी प्रमुख – माधव गोधणे, प्रसिद्धी प्रमुख – नरेश तुप्तेवार अशी निवड करण्यात आली आहे . दरम्यान, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रकाश कांबळे, माजी कोषाध्यक्ष तथा पत्रकार अधिस्वीकृती समितीचे विभागीय अध्यक्ष विजय जोशी, माजी सरचिटणीस चारुदत्त चौधरी, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा संघटक ऍड. प्रदीप नागापूरकर, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गोवर्धन बियाणी, नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष पांडागळे, कार्याध्यक्ष अनिल कसबे, सरचिटणीस अनुराग पोवळे आदींनी या नूतन कार्यकारिणीच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील यशस्वी कार्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!