गौरी पुजनाच्या सजावटीमध्ये आकर्षक सैनिकी देखावा

नांदेड(प्रतिनिधी)-सर्वत्र गौरी पुजन उत्साहात पार पडले. अनेकांनी आपल्या घरी गौरी मुर्तींची स्थापना केली. दुसऱ्या दिवशी त्यांना नैवेद्य दाखविण्यात आला आणि तिसऱ्या दिवशी त्यांना निरोप देण्यात आला. काही ठिकाणी या दिवसांमध्ये फरक झाला आहे. परंतू उत्साहाच्या वातावरणात गौरी पुजन पार पडले. नांदेडमधील सदाशिव अल्लमखाने यांच्या घरी गौरी पुजनाच्या सजावटीमध्ये ऑपरेशन सिंदुरचे देखावे तयार करण्यात आले होते. आपल्या धार्मिक पुजनासह आपल्या देश प्रेमाची महती या सजावटीतून दिसली.
सर्व हिंदु बांधवांच्या घरी गौरी स्थापना झाली. त्यानंतर तिसऱ्या दिवशी त्यांना निरोप देण्यात येतो. अनेकांना गौरी दर्शनासाठी आपल्या घरी निमंत्रण दिले जाते. अत्यंत उत्साहात हा गौरी पुजन सोहळा शहरात अनेक घरांमध्ये पार पडला. यात विरशैव गवळी समाजाचे अध्यक्ष तथा विरशैव नगरकर गवळी समाज एकीकरण समिती महाराष्ट्राचे सहसचिव सदाशिव प्रभुअप्पा अल्लमखाने यांच्या घरी एक विशेष सजावट होती. ही सजावट धार्मिक पुजनासह देशप्रेमाची जोड दाखवत होती.
सदाशिव आलमखाने यांचे प्रभु गवळी डेअरी आणि स्विट नावाची एक दुकान आहे. त्या दुकानामागे त्यांचे घर सुध्दा आहे. आपल्या घरात त्यांनी ऑपरेशन सिंदुरमधील देखावे गौरी पुजनाच्या सजावटीत तयार केले. त्यात बृम्होस मिसाईल दाखविण्यात आली. तसेच सैनिकांना लढण्यासाठी लागणारे वाहन, दुरसंचार संच अशा अनेक सैनिकी गरजांचे साहित्य या सजावटीत लक्ष वेधत होते. नांदेडमधील मनदिपसिंघ शिलेदार हा युवक थलसेनेत लेफ्टनंट या पदावर नियुक्त झाला. त्याचे पोस्टर लावून त्याचाही सन्मान करण्यात आला होता. अल्लमखाने यांनी अनेकांना आपल्या घरी निमंत्रण दिले होते. सकाळपासूनच त्यांच्या घरात गौरी पुजनातील सैनिक सजावट पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.
देशाच्या पातळीवर ऑपरेशन सिंदुर काय आहे, त्याचा परिणाम काय झाला, सरकार काय सांगते, विदेशात या ऑपरेशनबद्दल भारताला काय प्रतिक्रिया मिळत आहेत. हा वेगळा विश्लेषणाचा भाग आहे.परंतू सदाशिव अल्लमखाने यांच्या घरात तयार करण्यात आलेला सैनिकी देखावा जनतेच्या मनातील सैन्याबद्दलचे प्रेम आणि ऑपरेशन सिंदुरमध्ये भारतीय सैन्याने केलेली कामगिरी घरकरुन गेली आहे. हे नक्कीच.

व्हिडिओ….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!