नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड पोलीस परिक्षेत्रातील चार जिल्ह्यातील पोलीसांनी अवैध धंद्यांविरुध्द 1155 खटले दाखल केले आहेत. त्यात एकूण 3 कोटी 39 लाख 2 हजार 634 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कार्यवाही करणाऱ्या चारही जिल्ह्याच्या पोलीसांचे पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप यांनी कौतुक केले आहे.
ऑगस्ट महिन्यात अवैध दारु, मटका, जुगार, ऑनलाईन लॉटरी, क्रिकेट बॅटींग, गुटखा, अंमलीपदार्थ, वेश्या व्यवसाय, वाळू उपसा, बेकायदेशीर वाळू वाहतूक, अशा सर्व अवैध धंद्यांवर पोलीस कार्यवाही करत आहेत.
नांदेड जिल्ह्याने ऑगस्ट महिन्यात 443 आरोपींविरुध्द 310 खटले दाखल केले आहेत. त्यात 1 कोटी 1 लाख 23 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. परभणी पोलीसांनी 397 गुन्हे दाखल करून त्यात 378 लोकांना आरोपी केले आहे. परभणी जिल्ह्यात 62 लाख 66 हजार 743 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. लातूर पोलीसांनी 367 आरोपींविरुध्द 230 गुन्हे दाखल केले आहेत. लातूर पोलीसांनी 1 कोटी 34 लाख 51 हजार 556 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंगोली पोलीसंानी 330 आरोपीविरुध्द 318 गुन्हे दाखल केले आहेत. त्यात 40 लाख 61 हजार 265 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मे, जुन आणि जुलै या तिन महिन्यात नांदेड पोलीस परिक्षेत्रातील चार जिल्ह्यातील 6 हजार 163 लोकांविरुध्द 5618 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात एकूण 27 कोटी 40 लाख 55 हजार 793 रुपयंाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अवैध व्यवसायाची माहिती देण्यासाठी खबर या नावाने पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाने एक हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनचा क्रमांक 9150100100 असा आहे. नागरीकांनी या हेल्पलाईनवर फोन करून किंवा व्हाटसऍप संदेश देवून अवैध व्यवसायाची माहिती द्यावी. सोबतच पोलीस उपमहानिरिक्षक कार्यालयाच्या nandedrange.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा अवैध धंद्याची माहिती जनतेला देता येईल.
ऑगस्ट महिन्यात चार जिल्ह्यातील पोलीसंानी 1115 गुन्हे दाखल करून 3 कोटी 40 लाखांचा मुद्देमाल जप्त केला
