नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड ग्रामीण पोलीसांनी धनेगाव पाटीजवळील रॉयल इनफिल्ड शोरुमच्या बाजुच्या गल्ली धाड टाकून चार जुगाऱ्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून 1 लाख 96 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये दोन दुचाकी गाड्या आणि चार मोबाईल आहेत.
पोलीस अंमलदार नितीन गंगलवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 31 ऑगस्टच्या रात्री 11 वाजेच्यासुमारास त्यांनी धनेगाव पाटीजवळच्या गल्लीत छापा टाकला. त्या ठिकाणी मोकळ्या जागेत शेख गौस शेख कदीर (31), अब्दुल वैदुस जम्मा अब्दुल खदीर (38) रा.पिरबुऱ्हाननगर नांदेड, इरशाद बेग मुस्तफा बेग (43) रा.संभाजीनगर वर्कशॉपजवळ, शेख फारुख शेख बेनीमेअर (51) रा.बर्कीचौक नांदेड या चौघांना पकडले जुगार खेळण्याचे बदक छाप पत्ते रोख रक्कम, चार मोबाईल आणि दोन दुचाकी गाड्या असा 1 लाख 96 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक प्रशांत शिंदे, पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक बाबुराव चव्हाण, पोलीस अंमलदार विठ्ठल भिसे, नितीन गंगलवाड, गवेंद्र शिरमलवार, शंकर माळे, जमीर आणि कांबळे यांनी केली.
नांदेड ग्रामीण पोलीसांनी चार जुगार पकडले
