नांदेड : महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंती निमित्त शनिवार दि. 30 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य या साहित्य संस्थेकडून भव्य कविसमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 10 वर्षीपासून अक्षरोदय साहित्य मंडळ हि साहित्य संस्था परिर्वतनाचे काम साहित्याच्या माध्यामातून करत आहे. आपला समाज जागृत व्हावा सत्याची अनुभूती व्हावी आणि विकास व्हावा हा उद्देश मनात बाळगून हे साहित्य मंडळ कार्य करते आहे.
महाकवी वानदादा कर्डक यांच्या जयंतीचे औचित्याने मंडळाने कविसंमेलनाचे आयोजन केले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून नांदेड मधील जेष्ठ साहित्यिक थोरात बंधू हे होते. तर प्रमुख पाहुण्या कवयित्री विमलताई शेंडे व कवयित्री जयाताई सुर्यवशी या जेष्ठ साहित्यिका होत्या. वामनदादा कर्डक दलित साहित्याच्या प्रखर परंपरेती जेष्ठ कवी, यांचे संपूर्ण आयुष्य समाजजागृतीसाठी आणि समतेच्या चळवळीसाठी झटणारे होते. त्यांच्या कवितेत अन्यायाविरोधातील प्रखर आवाज, समाजक्रांतीची ज्वाला आणि परिवर्तनाची आस दिसून येते. असे कवयित्री विमताई शेंडे यांनी या वेळी सांगीतले.
त्यांनी लिहलेल्या कवितांमध्ये समातातीक अन्याय, शोषण, भूक, दारिद्रय आणि संघर्ष यांचे वास्तव ठळकपणे उमटले असे या वेळी कवयित्री जयाताई सूर्यवंशी यांनी प्रखरपणे सांगीतले.
कविसंमेलनाच्या अध्यक्षीय समारोपात कवी थोरात बंधू यांनी सीगीतले वामनदादा यांनी फक्त कविता लिहिली नाही, तर मंचावरूनही हजारो श्रोत्यांना आपल्या ओजस्वी आवाजाने पेटवले. त्यांच्या कवितेत विद्रोह असला तरी ती विध्वंसक नव्हता, तर नवसर्जनाकडे नेणारा होता.
या कविसंमेलनात कवी. चंद्रकांत चव्हान, आ.ग. ढवळे, महेंद्र भगत, सरस्वती गोणाकर, गयाताई कोकरे, गझलकार चहकांत कदम, शिलाताई कोकाटे अजनांताई भेरजे, सुधाताई कांबळे, प्रभाताई इंगळे, सदानंद सपकाळे यानी वामनदादा यांच्यावर कविता – सादर केल्या. व महाकवी वामनदादा कर्डक व प्रतापसिंग बोदडे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाच्या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संजय निवडगे, प्रा. प्रल्हाद हिंगोले, डॉ. रंगनाथ नवघडे यांचा सत्कार करण्यात आला. कवीसंमेलनाचे सुत्रसंचालन मंडळाचे सदानंद सपकाळे यांनी केले. व आभार मंडाळाचे चंद्रकांत चव्हाण यांनी मानले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी मंडळाचे अविष्कार शिंदे पंकज कांबळे, सुयोग भगत, अजित मुनेश्वर, विनय केरमकोंडा, अतिश आठवले, सदानंद सपकाळे, आशा सपकाळे यांनी परिश्रम घेतले.
