राहुल गांधी यांच्या बिहार यात्रेदरम्यान, एका व्यासपीठावरून एका अनोळखी व्यक्तीने माईकचा ताबा घेतला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अत्यंत अपमानास्पद शब्दांत आपली मतं व्यक्त केली. या प्रकाराचा आम्ही पण निषेध करतो. काँग्रेस पक्षाने देखील याचा निषेध केलेला आहे. अशा शब्दांची कुणीही समर्थन करू शकत नाही, कारण त्यांना चांगले म्हणणे म्हणजे स्वतःचाच अपमान करणे होय.परंतु प्रश्न असा आहे की, भारतीय जनता पक्षाचे काही नेते जेव्हा इतरांबद्दल अत्यंत अश्लील आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर करतात, तेव्हा त्यांना इतरांकडून वापरण्यात आलेल्या वाईट शब्दांवर टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे का?

या पार्श्वभूमीवर, राहुल गांधी म्हणाले होते की, “सत्य आणि अहिंसेसमोर असत्य व हिंसा टिकू शकत नाही. तुम्ही कितीही मारलेत, तोडलेत तरी आम्ही सत्य आणि संविधानाच्या रक्षणासाठी उभे आहोत. सत्यमेव जयते!” यानंतर आणखी गोंधळ निर्माण झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वी महिलांविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी “५० कोटींची गर्लफ्रेंड” असा उल्लेख केला होता. आणि आज त्याच भाजपचे लोक शिष्ट भाषेच्या मुद्द्यावर वाद घालत आहेत. राहुल गांधींनी नरेंद्र मोदींबद्दल काही विधान केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बिहारच्या ‘मतदार अधिकार यात्रे’मध्ये ज्या व्यक्तीने पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह शब्द वापरले, तो काँग्रेसचा कार्यकर्ता नाही, आणि त्याचा पक्षाशी कोणताही संबंध असल्याचा पुरावा नाही. काँग्रेसने त्याच्याशी कोणतेही संबंध नाकारले असून, व्यासपीठाच्या आयोजकांनी त्याच्या हातून माईक हिसकावून त्याला हटवले. तो व्यक्ती एक पंचर व्यवसायिक आहे.आज भाजपने विरोधकांवर भाषेच्या मर्यादा ओलांडल्याचा आरोप केला आहे, पण उदाहरणे नेहमी वरच्या स्तरावरून दिली जातात. राहुल गांधी म्हणाले होते की, “नरेंद्र मोदी मतदानाची चोरी करून निवडणूक जिंकतात, मतदान वाढवतात, कमी करतात आणि निवडणूक आयोग त्यांना मदत करतो.” यावरही गुन्हा दाखल झाला.

सुब्रमण्यम स्वामी, जे भाजपमध्ये होते, त्यांनी सोनिया गांधींविषयी अपमानास्पद शब्द वापरले. अभिनेता आणि भाजप खासदार परेश रावल यांनी सोनिया गांधींना “बारबाला” म्हणाले. नरेंद्र मोदी यांनीही काँग्रेसच्या विधवांच्या खात्यांत पैसे जातात असे विधान केले होते. गुजरातमध्ये दिलेल्या भाषणात त्यांनी सोनिया गांधींना “जर्सी गाय” आणि राहुल गांधींना “बछडा” म्हटले होते.एकदा एका विद्यार्थिनीने डिस्लेक्सिया या विषयावर पंतप्रधानांना प्रश्न विचारला असता, त्यांनी तो मुद्दा राहुल गांधी आणि त्यांच्या आईशी जोडून चेष्टा केली होती. पंतप्रधानांनी असाही दावा केला की, “काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नेत्या निवडणूक लढवू शकत नाहीत, म्हणूनच त्या राजस्थानमधून राज्यसभेत आल्या.”

लोकसभेत काँग्रेसच्या रेणुका चौधरी हसत असताना मोदी म्हणाले, “अध्यक्ष महोदय, असे हास्य रामायणानंतर प्रथमच ऐकले.” अप्रत्यक्षपणे त्यांनी त्यांची तुलना राक्षसी ताडकेशी केली.एकदा रमेश विधुडी नावाच्या खासदाराने मुस्लिम खासदार दानिश अली यांच्याबद्दल “कटवे,मुल्ले, आतंकवादी” असे अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरले. त्यावेळी भाजप नेते रविशंकर प्रसाद त्यामागे बसले होते आणि ते हसत होते. तरीही रमेश विधुडी यांच्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

गौरव भाटिया यांनी एका पत्रकार परिषदेत राहुल गांधींच्या फोटोसमोर “गांडू” असा फलक लावलेला होता. संदीप पात्रा, प्रेम शुक्ला यांसारखे भाजप प्रवक्तेही वारंवार अश्लील व खालच्या स्तराचे वक्तव्य करत असतात. तरीही आज संदीप पात्रा “गालीवाली काँग्रेस” असा नारा देतात. पण त्यांनी स्वतःच्या भाषेचा आढावा घेणे गरजेचे आहे.संदीप पात्रा म्हणतात, “शिव्या देऊन कोणीही पुढे जाऊ शकत नाही.” मग हा नियम फक्त काँग्रेससाठीच का? भाजपसाठी नाही का?

भाजप नेते निशिकांत दुबे यांनी महुआ मोइत्रा व पांडे यांच्याबद्दल “नगरवधू” असा शब्द वापरला. हे शब्द ‘वेश्या’ या अर्थाने वापरले गेले. तरीही त्यांच्या विरोधात कोणतीही तक्रार दाखल झाली नाही.राहुल गांधींना मर्यादा पाळण्याची शिकवण देताना, भाजपने स्वतःच्या आचरणाचेही आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. कारण भाषेच्या मर्यादांबाबत भाजपने आपली नैतिकता हरवलेली आहे, असे पत्रकार अभिसार शर्मा यांचे मत आहे.

