नांदेड –अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वामन दादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त भव्य कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या 30 तारखेला संध्याकाळी 5 वा. माता रमाई बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे संपन्न होणार असून साहित्यप्रेमींसाठी हा सोहळा एक आगळावेगळा काव्यमहोत्सव ठरणार आहे.
या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर विराजमान राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून कवयित्री जयाताई सूर्यवंशी व कवयित्री विमलताई शेंडे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत.
नांदेड येथील मान्यवर कवी यांनी या विचारपीठावर आपली काव्यरचना सादर करावी अशी नम्र विनंती मंडळाचे पदाधिकारी यांनी केली आहे. वामन दादा कर्डक यांच्या विद्रोही विचारांचा व समाजपरिवर्तनाच्या प्रेरणेचा ठसा या कविसंमेलनातून उमटणार आहे.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अक्षरोदय साहित्य मंडळाचे आविष्कार शिंदे, पंकज कांबळे, सुयोग भगत, अजित मुनेश्वर, विनय कैरमकोंडा, अतिश आठवले, सदानंद सपकाळे व आशा सपकाळे परिश्रम घेत आहेत.
