नांदेड(प्रतिनिधी)-गंभीर गुन्ह्यातील तपास योग्यरितीने व्हावा. सोबतच 7 व 7 वर्षापेक्षा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये वैज्ञानिक पुरावे जमा करण्याची पध्दत आता सुरू झाली आहे. त्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलाने फॉरेंन्सीक मोबाईल व्हॅन कार्यरत केल्या आहेत. त्यातील एक व्हॅन नांदेड जिल्ह्याला प्राप्त झाली असून आज पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप आणि पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी हिरवी झेंडी दाखवून कामाची सुरूवात केली.
राज्यात दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये पुराव्यांच्या अभावामुळे गुन्ह्यातील आरोपी मुक्त होतात. त्यात अनेक अशा प्रगतीच्या घटनाा घडल्या आहेत. ज्यात वैध वैज्ञानिक पुरावा आरोपीला शिक्षा देण्यास जास्त समर्थ ठरतो. म्हणून महाराष्ट्र पोलीस दलाने फॉरेंन्सीक मोबाईल व्हॅन कार्यरत करण्याचा निर्णय घेतला. त्यातील एक फॉरेन्सीक मोबाईल व्हॅन नांदेड जिल्ह्याला प्राप्त झाली. आज पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांनी या फॉरेन्सीक व्हॅनला हिरवी झेंडी दाखवून तिच्या कार्यान्वयाची सुरूवात केली.
या व्हॅनमध्ये अत्याधुनिक रासायनिक विश्लेषण होईल. त्यासाठी आवश्यक उपकरणे उपलब्ध आहेत, डीएनए व रक्तनमुने तपासणी किट उपलब्ध आहे, सोबतच डिजिटल पुरावे संकलनाची साधन सामुग्री उपलब्ध आहे. ही व्हॅन 24 तास पोलीस तपासासाठी उपलब्ध राहिल. या व्हॅनमध्ये सहाय्यक रासायनिक विश्लेषक, वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक असे अधिकारी उपलब्ध राहतील. या फॉरेन्सीक व्हॅनमुळे घटनास्थळांवरच प्राथमिक निकृष मिळू शकेल. त्यामुळे वेळेची बचत होईल आणि घटनास्थळांवरील पुरांमध्ये छेडछाडीची शक्यता कमी होईल. तपासाच्या प्रक्रियेत गती मिळेल. न्यायदानाच्या कामात पारदर्शकता आणि गती प्राप्त होईल.
शहाजी उमाप यांच्या हस्ते फॉरेन्सीक व्हॅनला हिरवी झेंडी
