गोपनीयतेचा खून: खा निशिकांत दुबेच्या कृत्याने पत्रकार, सरकार आणि कायदा धोक्यात  

पत्रकाराची बेअब्रू करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी जे कृत्य केले, ते अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह आहे. त्यांनी केवळ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रतिमा मलीन केली नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही अप्रत्यक्षपणे बेअब्रू केली आहे. शिवाय, स्वतःच्या वागणुकीचा बुरखा फाडण्यासाठी एक नवीन मार्ग तयार केला आहे.प्रश्न असा निर्माण होतो की, खासदार निशिकांत दुबे हे हे सर्व कोणाच्या इशाऱ्यावर करत आहेत? जर ते वित्तमंत्री आणि पंतप्रधानांबद्दल अशा पद्धतीने वादग्रस्त वागणूक देत असतील, तर त्या मागे कोण आहे, हे शोधणे हा एक मोठा संशोधनाचा विषय आहे.आर्टिकल 19 चे नवीन कुमार यांनी वाचकांना आवाहन केले आहे की, जर निशिकांत दुबे हे कोणाच्या सांगण्यावरून हे करत असतील, तर त्या व्यक्तीचे नावही जनतेसमोर यायला हवे.निशिकांत दुबे यांनी भारतीय आयकर कायद्याचा आणि ‘ऑफिशियल सिक्रेट्स अ‍ॅक्ट’चा संपूर्ण अपमान केला आहे. त्यांनी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांचा उल्लेख करत एका पत्रकाराचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) सार्वजनिकरित्या शेअर केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर त्या कागदपत्रांचे फोटो शेअर करत लिहिले आहे, “ओळखा, कोणत्या महान पत्रकाराचा हा ITR आहे? नोकरी करताना १८ लाख कमावले, नोकरी सोडल्यानंतर नरेंद्र मोदी आणि भाजपला गल्लीगल्ली फिरून शिव्या देत करोडपती झाले ,हीच आहे खरी पत्रकारिता!”

ते ITR एक, दोन नव्हे तर तीन वर्षांचे आहेत. त्या रिटर्नमध्ये आय, करपात्र उत्पन्न, त्यात दाखल केलेली तारीख, वेतन, व्यवसाय, इतर उत्पन्न यांचे सविस्तर तपशील आहेत. असा दस्तऐवज फक्त आयकर विभागाकडेच असतो. तो इतर कोणाकडे असणे किंवा तो सार्वजनिक करणे, हे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.

मग प्रश्न उरतो – निशिकांत दुबे यांच्याकडे हे गोपनीय कागद कसे आले?

  • त्यांनी वित्त मंत्रालयाचे संगणक हॅक केले का?
  • आयकर विभागात कोणी गद्दार आहे का?
  • हा माहिती अधिकारात सुद्धा मिळत नाही, तर दुबे यांना हा माहितीचा स्त्रोत कोण?

पत्रकार अभिसार शर्मा यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया दिली असून निर्मला सीतारामन यांना उद्देशून विचारले आहे.  “तुमचं मंत्रालय चालवतंय कोण , तुम्ही की खासदार दुबे?” त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “हा ट्विटरवरचा ड्रामा सुरू ठेवणाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न आहे का?” तसेच त्यांनी निशिकांत दुबे आणि आयकर विभागाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची घोषणाही केली आहे.पत्रकार रविश कुमार यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “पंतप्रधान मोदी यांची पदवी खाजगी असू शकते, पण एका पत्रकाराचा ITR सार्वजनिक? हे कसं चालेल?” त्यांनी यावर प्रश्न उपस्थित केला आहे की, “आता BJP पत्रकारांचे ITR उघड करून त्यांना टार्गेट करणार का?” त्यांच्या मते, हे अत्यंत त्रासदायक आणि चिंताजनक आहे.

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी निशिकांत दुबे यांच्या शैक्षणिक पात्रतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, दुबे यांच्याकडे विद्यावाचस्पती (PhD) पदवी आहे, पण दिल्ली विद्यापीठाच्या पत्रानुसार 1993 मध्ये त्यांचं नाव MBA अभ्यासक्रमात नव्हतं. शिवाय, त्यांनी राजस्थानच्या प्रताप विद्यापीठातून विद्यावाचस्पती पदवी मिळवली आहे, तीही पदवीधर अभ्यासक्रम न केल्याने वैध ठरत नाही.नवीन कुमार यांनी यावर निशिकांत दुबे यांना आव्हान दिलं आहे, “जर खरंच दम असेल, तर गौतम अडाणी, मुकेश अंबानी, अनिल अंबानी यांचेही आयकर रिटर्न सार्वजनिक करा. ते होणार नाही, कारण तुम्ही केवळ पत्रकारांना टार्गेट करत आहात.”या सगळ्या प्रकरणातून एक गंभीर चित्र समोर येतं, जेव्हा देशाच्या गोपनीय दस्तऐवजांची सुरक्षा धोक्यात येते, आणि सत्ताधारी पक्षाचे लोकच ती कागदपत्रे गैरप्रकारासाठी वापरतात, तेव्हा संपूर्ण प्रणालीचं विश्वासार्हता डळमळीत होते. कायद्याचा भंग करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, मग ते कोणीही असो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!