नांदेड(प्रतिनिधी)-दोन अनोळखी महिला मादाळी ता.कंधार येथे एका महिलेची फसवणूक करून तुमचे दागिणे आणि पितळी भांडी उजळून देतो म्हणून 58 हजार रुपयांचा ऐवज फसवणूक करुन घेवून गेले आहेत.
मादळी येथील अहमदाबी शेख इसाक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या घरी दोन महिला आल्या आणि त्यांच्या सासुला म्हणाल्या तुमचे सोन्याचे दागिणे व पितळी भांडे उजळून देतो. अहमदाबीच्या सासुने काही सोन्याचे दागिणे आणि पितळी भांडे दिले. ते नजर चुकून त्या दोन महिला घेवून गेल्या आहेत. कंधार पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 298/2025 प्रमाणे दाखल केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अंमलदार गिते हे करीत आहेत.
दोन अनोळखी महिलांनी एका महिलेची फसवणूक करून 58 हजारांचा ऐवज केला लंपास
