गुरुद्वारा चौकातील निकामी पुल काढण्यासाठी खर्च होणार लाखो रुपये

नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा चौकात तयार करण्यात आलेला 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा पादचारी पुल आता पाडून टाकण्यासाठी नवीन निविदा तयार होत आहे. या पुलापासून कोणालाच उपयोग नव्हता.
गुरुद्वारा चौक येथे एक पादचारी पुल तयार करण्यात आला. असाच एक दुसरा पुल देगलूर नाका परिसरात तयार करण्यात आला. सांगण्यात येते की, या दोन पुलांसाठी जवळपास 4 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्यात आला होता. मुळात या पादचारी पुलांना तयार करण्याच्या निविदा निघाल्या होत्या. तेंव्हा त्या फक्त 70 लाख रुपयांच्या होत्या. पण ते काम संपे संपेपर्यंत त्या पुलाची किंमत 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली.


गुरुद्वारा चौरस्त्यातून प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मिरवणूका निघतात आणि या मिरवणूकीत सहभागी होण्यासाठी भारतासह विदेशातून सिख भावीक येत असतात परंतू काही दिवसातच हे लक्षात आले की, या पुलावर जी मंडळी मिरवणूकींच्या काळात उभी राहते. त्यामुळे एकूण वजनाचा विचार करता पादचारी पुल धोकादायक आहे. काही माणसे त्या पुलावरुन ये-जा करू शकतात. परंतू मोठी गर्दी त्या पुलावर थांबली तर मोठी जिवीत हानी होण्याची शक्यता पाहता मिरवणूकांच्या काळात त्या पुलांवर कोणी जाणार नाही.यासाठी पोलीसांना वेगळा बंदोबस्त लावावा लागत होता.
आता अनेक वर्षानंतर कोण्या तरी हुशार व्यक्तीला याची जाण झाली आणि आता गुरुद्वारा चौकातील हा पादचारी पुल तसेच देगलूर नाका येथील पादचारी पुल काढून टाकण्यासाठी नविन निविदा तयार केली जात आहे. काही दिवसांपुर्वीच तांत्रिक लोकांनी या पुलाचे मोजमाप घेतले आहे. पुलावर दोन्ही बाजूला पत्रे लावून पुल जाण्या-येण्यासाठी बंद करण्यात आला आहे.
कोणताही उपयोग नससलेला पुला अनेक वर्ष नांदेडकरांनी पाहिला. त् यासाठी कोट्यावधी रुपये तयार करतांना झाले आणि सांगितले जात आहे की, हा पुल काढून टाकण्यासाठी सुध्दा मोठा खर्च होणार आहे. या खर्चाची माहिती वृत्त लिहिपर्यंत प्राप्त झाली नव्हती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!