नांदेड(प्रतिनिधी)-एका वडापाव विकणाऱ्या गाडीवाल्याला पाच हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्या कुबड्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नांदेड शहरात अत्यंत नामांकित व्यक्ती असलेला इरफान उर्फ कुबडा रा.नवी अबादी शिवाजीनगर नांदेड हा 23 ऑगस्ट रोजी सकाळी 4.30 वाजता कर्मविर हॉस्पीटल जवळ आला आणि तेथे वडापाव विकणाऱ्या शेख नसीर शेख अमीर यास पाच हजार रुपयांची खंडणी मागितली. कारण त्याला रेल्वे स्थानक परिसरात वडापावचा गाडा लावून व्यवसाय करायच आहे आणि त्यासाठी ही पाच हजार रुपयांची खंडणी आहे. जसे काय रेल्वे स्थानक परिसर हा भाग कुबड्याच्या बापाने त्याच्या नावावर करून दिलेला आहे. खंडणी मागून शेख नसीरला लोखंडी कड्याने मारहाण केली आणि त्याला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी वजिराबाद पोलीसांनी गुन्हा क्रमांक 365/2025 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रशांत लोंडे यांच्याकडे देण्यात आला आहे.
वडापाव विकणाऱ्याला कुबड्याने मागितली खंडणी
