नांदेड(प्रतिनिधी)-अनेक पोलीस एकदा पोलीस दलात आल्यानंतर सुध्दा दुसऱ्या विभागाच्या परिक्षा देतात. पण यामध्ये बेशिस्त वर्तन होते. म्हणून राज्य राखीव पोलीस बलाचे अपर पोलीस महासंचालक राजकुमार व्हटकर यांनी परिक्षासाठी परवानगी द्यावी असे परिपत्रक जारी केले आहे.
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस भरतीमध्ये जिल्हा, पोलीस आयुक्तालय या ठिकाणी पदे रिक्त झाल्यानंतर राज्य राखीव पोलीस बल गटातील नवप्रविष्ठ शस्त्र पोलीस शिपाई तसेच इतर पोलीस अंमलदार भरती करीता अर्ज करतात. काही प्रकरणात गट कार्यालयाची पुर्व परवानगी न घेता बेशिस्त वर्तन करून कर्तव्यावर अनाधिकृतपणे गैरहजर राहून परिक्षा देतात आणि निवड झाली तर गट कार्यालयास कळवून राजीनामा देवून कार्यमुक्त होण्यासाठी विनंती करतात.
शासकीय नियमाप्रमाणे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्याने वरिष्ठ कार्यालयाची पुर्व परवानगी घेवूनच परिक्षा द्यायची असते. राज्य राखीव पोलीस बलातील सर्व समादेशकांनी आपल्या अधिनिस्त असलेल्या पोलीस अंमलदारांना याबाबत लेखी सुचित करावे आणि त्यांना परवानगीसाठी अर्ज करण्यास सांगावे. समादेशकाने चार दिवसात परवानगी न दिली तर परवानगी आहे असे गृहीत मानले जाईल. म्हणून परस्पर रुग्ण निवेदन, अनाधिकृत गैरहजर या प्रकरचे बेशिस्त वर्तन होणार नाही याची दक्षता कंपनीनायक आणि समादेशकांनी घ्यायची आहे.
रा.रा.पोलीस बलातील कर्मचाऱ्यांना इतर परिक्षा देण्यासाठी परवानगी मिळणार
