नांदेड विमानतळ बंद; पुढील एक महिना उड्डाणे स्थगित

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड विमानतळाची धावपट्टी अति पावसामुळे खराब झाल्याने, आजपासून (२२ ऑगस्ट) विमानतळ तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील किमान एक महिन्यापर्यंत नांदेडहून कोणतीही विमान सेवा सुरू होणार नाही, तसेच कोणतेही विमान नांदेडमध्ये उतरणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 

धावपट्टीची अवस्था अत्यंत खराब झाल्याने, विमान नियंत्रण प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी तपासणी करून तात्काळ विमानतळ बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, आता विमानसेवा पूर्णपणे थांबवण्यात आली आहे.नांदेड विमानतळ 2009 पासून रिलायन्स कंपनीकडे देखभाल व व्यवस्थापनासाठी देण्यात आले होते. मात्र, कंपनीकडून योग्य देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळे  हे अधिकार परस्पर काढून घेण्यात आले व विमानतळाचे संचालन महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (MADC)’ या संस्थेकडे सोपवण्यात आले.प्रत्येक पाच वर्षांनी धावपट्टीची दुरुस्ती आवश्यक असते. रिलायन्सने शेवटची दुरुस्ती 2017 मध्ये केली होती. त्यानंतर नियोजित वेळेत दुरुस्ती न झाल्यामुळे धावपट्टीची स्थिती खालावली. अलीकडील दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे स्थिती अधिकच बिघडली आहे.सध्याच्या अंदाजानुसार, नांदेड विमानतळ किमान पुढील एक महिना तरी पूर्णपणे बंद राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, प्रवाशांनी पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा विचार करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!