नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस आहोत अशी बतावणी करून पती-पत्नीकडून 1 लाख 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिणे गाढून घेवून जाणाऱ्या दोघांच्या मागे नागरीक दुचाकी घेवून पळाले असता त्या दोघांच्या दुचाकीचा अपघात झाला. ते दोघे सध्या पोलीसांच्या ताब्यात असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बऱ्याच दिवसांपासून पोलीस असल्याची बतावणी करून फसवणूक करणारे लोक ताब्यात आहेत.
दि.20 ऑगस्ट रोजी भिमराव दत्ता नरवाडे (55) आणि त्यांच्या पत्नी दोघे रा.अंबाळा ता. हदगाव येथे दुचाकीवर जात असतांना बामणी फाटा वळण रस्त्याजवळ नांदेड जाणाऱ्या दिशेकडे ते असतांना दोन जण आले आणि आम्ही पोलीस आहोत अशी बतावणी करून त्यांच्या हातातील सोन्याच्या अंगठ्या 1 लाख 30 हजार रुपयांच्या काढून डिक्कीमध्ये ठेवण्याचे सांगितले आणि हात चालाखी करून ते त्या अंगठ्या घेवून गेले.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार भिमराव नरवाडे यांच्या लक्षात आली. तेंव्हा तेथील नागरीकांपैकी काही जणांनी या दोन ठकसेनांचा पाठलाग केला. तेंव्हा पळसा गावाजवळ ते दुचाकीवरुन पळून जात असतांना त्यांचा अपघात झाला आणि लोकांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांची नावे तालीब हुसेन इरानी (42) आणि समीर हुसेन (32) दोघे रा.परळी वैजनाथ असे आहेत. जनतेने त्यांना पोलीसांच्या ताब्यात दिले असून अपघातात जखमी झाल्यामुळे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी तामसा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 169/2025 दाखल करण्यात आला असून पोलीस अंमलदार अशोक दाढे अधिक तपास करीत आहेत.
पोलीस असल्याची बतावणी करून 1 लाख 30 हजारांचा ऐवज पळविणाऱ्यांचा अपघात झाला
