नांदेड(प्रतिनिधी)-अन्न व औषधी प्रशासन व पोलीसांच्या विशेष पथकाने मेडिकल दुकानांवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय नशा येणाऱ्या गोळ्या विक्री करतांना कौठा, वाजेगाव, विष्णुपूरी येथे तपासणी करून तिन मेडिकल दुकांनावर कार्यवाही केली आहे.
दि.18 ऑगस्ट रोजी वाजेगाव येथील शिवकृपा एजन्सी ऍन्ड मेडिकल स्टोअर्स तसेच 20 ऑगस्ट रोजी विष्णुपूरी कमानीजवळ असलेल्या श्रीफॉर्मा मेडिकल आणि 21 ऑगस्ट रोजी कौठा येथील शंभु मेडिकल येथे तपासणी केली. त्या ठिकाणी डॉक्टारांच्या परवानगी शिवाय नशा येणाऱ्या गोळ्या सहज दिल्या जात होत्या. ही कार्यवाही अन्न व औषधी प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अ.तु.राठोड, पोलीस उपनिरिक्षक पंकज इंगळे, पोलीस अंमलदार रुपेश दासरवाड, प्रदीप खानसोळे, जसपालसिंघ कालो आदींनी ही कार्यवाही केली. यापुर्वी सुध्दा या पथकाने अनेक मेडिकल स्टोअर्सवर ही कार्यवाही केली आहे.
औषधी दुकानावर विशेष पथकाची कार्यवाही
