नांदेड :- लेंडी धरणाच्या पाण्याच्या पातळीत ढगफुटी व अतिवृष्टीमुळे लातूर, उदगीर आणि कर्नाटक भागातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू आहे. परिणामी, लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालेली असून काही गावांमध्ये नदीचं पाणी घुसले आहे.
पुनर्वसित रावनगाव, भासवाडी, भिंगेली व हासनाळ या गावांतील काही नागरिक मूळ ठिकाणी वास्तव्यास राहत असल्यामुळे, पुराच्या पाण्यात अडकण्याच्या घटना घडल्या आहेत.
मुखेड तालुक्यातत खालील गावांमध्येप शोध व बचाव कार्य चालु आहे.
• रावनगाव येथे अंदाजे225 नागरिक पाण्याहच्याी वेढयामध्येा अडकलेले आहेत. पैकी अतिशय प्रतिकुल परिस्थितीत अडकलेले 7-8 जणांना सुखरुप वाचवले आलेले आहे. मस्जीधदवर अंदाजे 15-16 नागरीक अडकलेले आहेत त्यांडचा शोध व बचावाची कार्यवाही पथकाकडुन चालु आहे.
• हसनाळ- येथे अंदाजे 7-8 नागरीक अडकलेले आहेत त्यां चा शोध व बचावाची कार्यवाही पथकाकडुन करण्यानत आली आहे.
• भासवाडी- येथे सुमारे20 नागरिक सुरक्षित आहेत, बचाव कार्य चालू आहे.
• भिंगेली- येथे सुमारे40 नागरिक सुरक्षित आहेत, बचाव कार्य चालू आहे.
हे सर्व नागरिक पूरस्थितीत अडकले होते. जिल्हा प्रशासनाच्या शोध व बचाव पथकाच्या एसडीआरएफ राज्या आपत्तीव प्रतिसाद दल, पोलीस, अग्नीनशमन दल, क्युआरटी (सिघ्र प्रतिसाद दल) व स्थाअनिक शोध व तत्परतेमुळे यांची सुखरूप सुटका करण्यात आली असून सर्वजण सुरक्षित आहेत.
जिल्हासधिकारी राहूल कर्डिले स्वसतः जातीने लक्ष ठेऊन आहेत तसेच उपविभागीय अधिकारी देगलूर व तहसिलदार मुखेड हे सुध्दाल घटनास्थवळी उपस्थित राहुन बचाव कार्य करत आहेत. जिल्हा प्रशासन पूर्णतः सतर्क असून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्यावतीने कळविले आहे.
