नांदेड– शहरात नुकतेच जय हिंद ऑटो सेना स्थापन करण्यात आली असून ती मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन संस्था पुरस्कृत संघटना असून ती भारत सरकारच्या अखत्यारीत NGO द्वारे चालविली जात असल्याचे संस्थेचे सचिव डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांनी सांगितले आहे. या अंतर्गत आम्ही ऑटो चालकाना विविध सेवा वस्तू पुरविण्याचा आमचा उद्देश आहे. जो ऑटो चालक मालक आमचा सदस्य असावा. तसेच Auto चालक मालक यांची पत्नी. मुली. परिवारातील महिलांना स्वालंबी होण्याकरिता पुढचा टप्पा त्यांना मोफत शिलाई मशीन ट्रेनिंग.एम्ब्रॅडरी.शिवण काम शिकवून संस्थेद्वारे शासनाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे नियोजन सुरू असून तो डिसेंबर अथवा जानेवारी महिन्यात ट्रेनिंग स्कूल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहेः जो महिला.मुली स्वतःच्या व्यासायकरिता लोन.कर्ज उपलब्ध होईल आणि स्वतःचा ते व्यवसाय सुरू करतील ज्यामुळे ऑटो चालक मालक यांचे परिवार समृद्धीच्या दिशेने वाटचाल करतील असे डॉ मोहम्मद आरीफखान पठाण यांनी म्हटले आहे.या कार्यक्रमास उपस्थिती वजीराबाद वाहतूक पोलिस निरीक्षक गुट्टे साहेब. इतवारा वाहतूक पोलिस निरीक्षक जगन पवार साहेब. इंजिनियर अजीज लहानकर. डॉ फहीम शेख. व ऑटो चालक मालक शेकडोच्या संख्येत उपस्थिती नोंदवून मोफत ड्रेसचा लाभ घेतला आहेःत्याचे मला समाधान वाटत आहे. ही योजना राबविणारी महाराष्ट्रातील पहिली एकमेव संघटना आहे जिचे कार्य वेबसाईट वर देश विदेशात पहायला मिळेल असे म्हणताच टाळ्यांच्या गजरात कॉम्प्लेक्स दणाणून गेला होता.
सदरील योजना राबविणारी आमची संस्था ही राज्यातील एकमेव असून जय हिंद ऑटो सेनेचे कार्य NGO च्या वेबसाईटवर बघायला मिळणार आहे. जो जिल्यातील. राज्यातील आणि देश विदेशातील सर्व जनता पाहू शकते. मुळात मौलाना आझाद अल्पसंख्याक मिशन संस्थेचे कार्य 2005 सुरू आहे. जी कोविड लॉकडाउन काळात गोर गरीबांना मोफत धान्य गहू. तांदूळ आणि नगद स्वरूपात 500 रुपये असे जे हक्कदार आहेतः त्यांनाच वाटप केलेले आहेत. तसेच आजपर्यंत 10 शिलाई मशीन वाटप केले गेले. दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येतो जो मोफत सर्व वाहनाना रेडियम. रिप्लेक्टर. लावून दिल्या जाते. आणि वेळोवेळी वाहतूक नियमाचे मार्गदर्शन शिबिरे घेण्यात येतोय. असाच एक हजारो ऑटो चालक मालक उपस्थित राहू शकतील असा मोठा वाहतूक मार्गदर्शन शिबिर घेण्याचा आमचा दृष्टिकोन आहे. ज्यामध्ये पोलिस महानिरीक्षक. पोलिस अधीक्षक. प्रादेशिक परिवहन अधिकारी. जिल्हा न्यायाधीश.वाहतूक पोलिस निरीक्षक. हे वाहतुकीचे नियम आणि महत्व पटवून देतील.
आम्ही ऑटो चालक मालकाना विनंती करतो की शहरातील समस्या जिकिरीचे बनले असून सर्वांनी नियम पाळून वाहन चालविणे ही काळाची गरज आहे. कारण प्रत्येक शहराची शान ही ऑटो चालकामुळे असते. रेल्वे. बस. फ्लाईट. असो तो उतरताच सर्वप्रथम ऑटो चालकाकडेच घरी जाण्यासाठी येतो मग तो कितीही मोठा व्यक्ती का असेना. यासाठी ऑटो चालकांनी प्रवाशांचा आदर करावा. ड्रेस घातल्याने तुम्ही ऑटो चालक असल्याचे त्यांना जाणीव होईल आणि तुम्हाला तुमचे भाडे मिळेल. कारण आज काही टवाळखोरामुळे ऑटो चालक बदनाम झालेला आहे तो कलंक पुसण्याचे कार्य आमची सेना करणार असल्याचे डॉ पठाण यांनी आवाहन केलेले आहेत.
