नांदेड(प्रतिनिधी)-संततधार पावसामुळे जीवन थांबवून टाकल्याचा प्रकार दिसत आहे. सर्वत्र धुवाधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यावर माणुस दिसत नाही. जिल्ह्यात व जिल्ह्याच्या आसपास असलेले सर्व प्रकल्प भरले असल्यामुळे अनेक प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रकल्पांच्या खालच्या बाजूला राहणाऱ्या लोकांचा त्रास जास्तच होत आहे.
आज सकाळपासून पाऊस काही-काही मिनिटेच थांबतो नाही तर तो जोरदारपणे पडत आहे. त्यामुळे सर्व जीवनाची गती थांबलेली आहे असे चित्र दिसत आहे. नांदेडच नव्हे तर जवळपास नांदेड जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यामध्ये या पावसामुळे नदी, नाले दुथडीभरून वाहत आहेत. रस्त्यावर माणुस दिसत नाही आहे. काही दुकाने उघडी दिसत आहेत. पण त्यात ग्राहक कोठून येणार अशी परिस्थिती आहे. एकूणच जीवन आहे तेथेच थांबलेले आहे. जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या आसपास असलेल्या प्रकल्पांमध्ये पाणी साठा भरपूर झाला आहे. त्यामुळे अनेक प्रकल्पांचे अनेक दार उघडलेले आहेत. त्यामुळे प्रकल्पांच्या खालच्या बाजूला राहणाऱ्या लोकांचा त्रास जास्त आहे.
संततधार पावसाने जीवन संथ
