ऑपरेशन सिदूरमध्ये वीरमरण पत्करलेल्या सार्जेंट सुरेंद्र मोगा यांच्या घरी जाऊन हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी श्रद्धांजली अर्पण केली. परंतु याच वेळी लोकशाहीच्या मंदिरात,संसदेमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले होते की “ऑपरेशन सिदूर दरम्यान कोणत्याही सैनिकाला कुठलाही इजा झालेली नाही.” यावरून स्पष्ट होते की आपल्या लोकशाहीच्या मंदिरात खोटेपणाचे धंदे किती बिनधास्तपणे सुरू आहेत, हे सामान्य नागरिकांनी समजून घ्यायला हवे.आजही असं सांगितलं जातं की ऑपरेशन सिदूर दरम्यान फायटर जेट चालवणारी वैमानिक शुभांगी सिंह बेपत्ता आहे. तिचं नेमकं काय झालं हे आजतागायत देशाला माहित नाही, आणि कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.दु:ख याचंही वाटतं की तीन महिन्यांनंतरच हवाई दल प्रमुख अमरप्रीत सिंग यांनी सुरेंद्र मोगा यांच्या घरी भेट दिली आणि त्यांच्या कुटुंबीयांना सांत्वना दिली. त्यामुळे आता असा प्रश्न उपस्थित होतो की सैन्यातील अधिकारी सुद्धा राजकीय लोकांप्रमाणेच वागत आहेत का?

राज्यसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजनाथ सिंह यांनी स्पष्टपणे सांगितले होते की ऑपरेशन शेंदूरदरम्यान आमच्या कोणत्याही जवानाला कोणतीही हानी झालेली नाही. त्यांनी हे ठामपणे व जोरात सांगितले. पण प्रत्यक्षात जेव्हा हवाई दल प्रमुख सुरेंद्र मोगा यांच्या कुटुंबाला सांत्वना देण्यासाठी गेले, तेव्हा सत्य वेगळं स्पष्ट झालं.राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील सुरेंद्र मोगा यांचे घर,तिथे जाऊन हवाई दल प्रमुखांनी श्रद्धांजली अर्पण केली, ती श्रद्धांजली खोटी आहे का? शहिदांचा सन्मानही वेळेत झाला नाही, आणि इकडे राजकीय नेते केवळ आपली प्रतिमा सुरक्षित ठेवण्यासाठी उगाच कॉलर टाईट करून फिरत आहेत.
स्वातंत्र्याचा ७९ वा वर्धापन दिन साजरा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला एक नवीन “चॉकलेट” दिलं. २०१४ मध्ये सत्तेवर येण्याआधी अमित शहा यांनी सांगितलं होतं की प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील. पण आज नरेंद्र मोदींनी सांगितलं की सार्वजनिक क्षेत्रात पहिली नोकरी मिळालेल्या युवकांना ‘पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना’अंतर्गत १५,००० रुपये दिले जातील.‘आज तक’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टपासून ही योजना लागू करण्यात आली असून, खासगी क्षेत्रात पहिली नोकरी मिळवणाऱ्या युवकांनाही याचा लाभ दिला जाईल. तसेच, ज्या कंपन्या रोजगार उपलब्ध करून देतील, त्यांनाही प्रोत्साहनपर रक्कम दिली जाणार आहे. सरकारच्या मते, या योजनेद्वारे जवळपास तीन कोटी युवकांना रोजगार मिळेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच्या भाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (RSS) खूप प्रशंसा केली आणि त्यांच्या १०० वर्षांच्या इतिहासाचा गौरव केला. पण हे विसरता कामा नये की स्वातंत्र्यसंग्रामात आरएसएसने कोणताही सहभाग घेतलेला नव्हता. त्यांच्या स्वयंसेवकांनीही स्वातंत्र्यलढ्यात कोणतेही लक्षणीय योगदान दिलेले नाही.या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे विरोधी पक्षांनी उपकार मानायला हवे होते. कारण गेल्या ७९ वर्षांत जे काही चुकलं त्याची जबाबदारी केवळ पंडित नेहरू यांच्यावर टाकणारे नरेंद्र मोदी आज संविधान निर्माणामध्ये नेहरूंचे योगदान कबूल करत आहेत. हे विरोधाभास दाखवून देणारे आहे.

