नांदेड(प्रतिनिधी)-एका घरात झालेल्या चोरीच्या संदर्भाने चार जणांनी मिळून एका व्यक्तीला पानाचा विडा खायला दिला त्यानंतर त्या माणसाला शारिरीक व मानसिक वेदना झाल्या. रामतिर्थ पेालीसंानी या प्रकरणी जादुटोणा प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल केला आहे.
परमेश्र्वर कंठीराम राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 11 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते 9 वाजेदरम्यान मौजे केरुर ता.बिलोली येथे गंगाधर रामा आरोटे, रामा नारायण आरोटे, राजू नारायण आरोटे तिघे रा.केरुर आणि गंगाराम संका कादरी रा.जारीकोटी ता.धर्माबाद यांनी परमेश्र्वर कंठीराम राठोडला 29 जुलै 2025 रोजी रामा आरोटेच्या घरी झालेल्या चोरीचा संशय घेवून त्यांना आणि इतर काही जणांना थंडगार पाण्यात बुडून तांदुळ टाकलेले नागेलीच्या पानात टाकलेले विडे खाण्यास दिले. यामुळे परमेश्र्वर राठोडच्या शरिराला आणि मनाला वेदना झाल्या. रामतिर्थ पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 254/2025 दाखल केला आहे. त्यात महाराष्ट्र नरीबळी, जादुटोणा प्रतिबंधक कायद्यातील कलम 13 जोडण्यात आले. या प्र्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार काळे हे करीत आहेत.
