मौजे आंडगा ता.लोहा येथे 6 लाख 75 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-मौजे आंडगा ता.लोहा येथे एक घरफोडून चोरट्यांनी 6 लाख 75 हजार रुपयांची चोरी केली आहे.
मौजे आंडगा येथील बालाजी तुकाराम सुरनर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 9 ऑगस्टच्या रात्री 11 ते 10 ऑगस्टच्या रात्री 5.30 वाजेच्यासुमारास त्यांच्या घराच्या पाठीमागील भिंतीच्या विटा काढून कोणी तरी चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. प्रवेश करून घरातील लोखंडी व लाकडी पेट्या शेतामध्ये घेवून गेल्या. शेतात त्या पेट्यांचे कुलूप तोडून त्यातील 6 लाख रुपये रोख रक्कम आणि 75 हजारांचे सोन्याचे दागिणे असा 6 लाख 75 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. माळाकोळी पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 152/2025 नुसार दाखल केली असून पोलीस उपनिरिक्षक सामले अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!