घोरबांडसह चार जणांवर गुन्हा दाखल

नांदेड(प्रतिनिधी)-गौण खनिज (वाळू) ची बेकायदा वाहतुक करणाऱ्या दोन टिप्परला नांदेड ग्रामीण पोलीसांनी पकडले आहे. दोन्ही टिपर आणि वाळू असा 14 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर 2 वाजेच्यासुमारास चंदासिंग कॉर्नर ते ढवळे कॉर्नर या दरम्यान पोलीसांनी एम.एच.04, एफज े7762 ची तपासणी केली. त्यामध्ये चोरटी वाळू भरलेली होती. तसेच मौजे निमजी रा.पिंपळगाव येथे पोलीस पथक गेले असतांना एम.एच.29 सीएच 4146 या टिप्परची तपासणी केली त्यात सुध्दा चोरटी वाळू भरलेली होती. दोन्ही टिप्परमध्ये प्रत्येकी 66 ब्रास वाळू आणि दोन टिप्पर असा 14 लाख 30 हजारांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोन स्वत: गुन्हे नांदेड ग्रामीण पोलीसांनी दाखल केले आहेत. पोलीस उपअधिक्षक डॅनियल बेन, पेालीस निरिक्षक बाळासाहेब रोकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक ज्ञानेश्र्वर मठवाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक संभाजी व्यवहारे,डफडे, आडे, कल्याणकर, जमीर, कांबळे यांनी ही कार्यवाही केलीी आहे. या दोन प्रकरणात गजाननन दत्तराम घोरबांड रा.बोरगाव ता.लोहा, साईनाथ व्यंकटी काळे रा.किवळा ता.लोहा, व्यंकट उर्फ सौरभ माराती आळणे रा.दगडगाव ता.लोहा, अजित गच्चे उर्फ बिट्या रा.बामणी ता.लोहा अशा चार जणांची नावे आरोपी सदरात नमुद आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!