दलितवस्ती कामाच्या निधीचा इतर वस्त्यांमध्ये दुरूपयो; चौकशी समिती स्थापन

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या हद्दीत इंदिरानगर येथील सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम स्थळ बदलून सुरू असल्याबाबत चौकशी करण्यासाठी समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दोन सदस्य समितीची स्थापना केली आहे. या बाबतची तक्रार डॉ.आंबेडकरनगर येथील पंकज कांबळे आणि पौर्णिमा नगर येथील दिपक कसबे यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयास केली होती.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत नांदेड शहरातील पौर्णिमानगर या दलितवस्ती भागात नागरीकांसाठी महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेत सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्याची परवानगी समाज कल्याण कार्यालयाने जुलै 2022 मध्ये दिली होती. यानंतर फेबु्रवारी 2024 मध्ये सहाय्यक आयुक्त कार्यालयाने ते स्थळ बदलून दिले. खरे तर हे काम दलितवस्तीतील आहे तर त्याच भागात होणे आवश्यक आहे. कारण दलितवस्तीतील लोकांना त्या सभागृहाचा उपयोग व्हावा.परंतू समाज कल्याण कार्यालयानेच इंदिरानगरचे नाव टाकून जागा बदलून दिली आहे. जीपीएस लोकेशनप्रमाणे बांधकाम सुरू असलेली जागा अंबेकरनगर दर्शवत आहे. अंबेकरनगर ही वस्ती पुर्णपणे स्वर्ण व हिंदु वस्ती आहे. इंदिरानगर भागात 15-20 घरे दलित समाजाची आहेत आणि इतर सर्व वेगवेगळ्या जमातीचे लोक आहेत. त्यामुळे जागा बदलून देण्याचे दिलेले आहेत चुकीचे आहेत ते बदलून द्यावे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार ते काम 1 कोटी 30 लाख रुपयांचे आहे. त्यातील 55 लाख रुपयांचा निधी कंत्राटदाराला अदा करण्यात आला आहे. दलितवस्तीच्या निधीची ही उधळपट्टी आहे. दलितवस्तीच्या कामाचा निधी इतर वस्त्यांमध्ये वापरून आजही 77 वर्षाच्या स्वातंत्र्य काळानंतर दलितांचे शोषण आहे. यासाठी चौकशी समितीची स्थापना व्हावी असा या निवेदनाचा आशय आहे.
या निवेदनाला अनुसरून समाज कल्याण विभागातील सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी समाज कल्याण विभागातील संतोष चव्हाण यांच्या अध्यक्षते एक समिती स्थापन करण्यात आली आहे. त्या समितीत सदस्य या पदावर कैलास राठोड यांना नेमण्यात आले आहे आणि या दोघांना दलितवस्ती योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या निधीचा योग्य विनियोग झाला की, नाही याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!