नांदेड(प्रतिनिधी)-गुजराथी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केतन नागडा हे 2018 पासून बेकायदाच अध्यक्ष आहेत. तसेच त्यांनी नियुक्त केलेले संचालक मंडळ सुध्दा बेकायदेशीर असल्याचा निकाल उपधर्मदाय आयुक्त ममता राखाडे यांनी दिला आहे.
गुजराथी शिक्षण संस्थेच्यावतीने उपधर्मदाय आयुक्तासमोर बदल अहवाल चौकशी क्रमांक 147/2019, 501/2017, 1179/2021 आणि 1180/2019 असे अर्ज दाखल होते. 2018 मध्ये संस्थेची निवडणुक झाली आणि त्यात केतन नागडाला अध्यक्ष करण्यात आले. या चेंजरिपोर्टमधील क्रमांक 1180 चा निकाल, 1179 चा निकाल, 147 चा निकाल हा 26 मे 2025 रोजी आला. त्या अगोदर चेंज रिपोर्ट चौकशी क्रमांक 501 चा निकाल 29 ऑगस्ट 2024 रोजी आलेला आहे. या सर्व चेंज रिपोर्टला उपधर्मदाय आयुक्तांनी नाकारले आहे. याचा अर्थ 2018 पासून गुजराथी शिक्षण संस्थेवर सत्ता भोगणाऱ्या अध्यक्ष केतन नागडा आणि सर्व संचालक मंडळाला उपधर्मदाय आयुक्तांनी बेकायदेशीर ठरवले आहे.
संस्थेने असदवन येथे गट क्रमांक 42 मध्ये 8.5 एकर जमीन 25 वर्षापुर्वी संस्थेचे सचिव हर्षद शाह असतांना घेतली होती. या संस्थेतील काही सदस्यांनी सांगितल्या प्रमाणे ही जागा केतन नागडा याने विक्रीस काढली आहे. जागा संस्थेची असतांना संस्थेला विक्री दर प्रति एकरी 1 कोटी रुपये सांगण्यात आला आहे. परंतू प्रत्यक्षा विक्रीदर प्रतिएकरी दीड कोटी रुपये आहे. म्हणजे यात घोळ आहेच. सन 2018 पासून हे गुजराथी शिक्षण संस्थेचे संचालक मंडळ हे बेकायदेशीर ठरले आहे. तरी कारभार केतन नागडाच्या हातात कसा आहे. 2018 ची निवडणुक सुध्दा निवडणुक निर्णय अधिकाऱ्याला फसवूण घेण्यात आली असा उपधर्मदाय आयुक्तांच्या निकालात उल्लेख आहे.
काही दिवसांपुर्वीच वजिराबाद भागात संस्थेच्या एका जमीनीवर केतन नागडाने एक व्यापारी संकुल उभारले आहे. त्या व्यापारी संकुलामध्ये सुध्दा परवानगी पेक्षा जास्त बांधकाम झाले असल्याचा आरोप होत आहे. संस्थेमध्ये नियमबाह्य शिक्षक भरती सुध्दा झालेली आहे. ही नियुक्ती माध्यमिक विभागात झालेली आहे. त्यामुळे गुजराथी शिक्षण संस्थेच्या शिक्षकांवर सुध्दा कधी गंडांतर येईल याचा काही नेम नाही.
या वेगवेगळ्या चौकशीमध्ये संस्थेचे बॅंक खाते अभिलेखावर असलेले सचिव प्रविणभाई पटेल यांच्या आक्षेपावरून गोठविण्यात आले होते. गुजराथी शिक्षण संस्था ही नामांकित शिक्षण संस्था आहे त्यामुळे खाते गोठविण्याची नामुषकी पहिल्यांदाच आली आहे. या संस्थेमध्ये भानुमती बालक मंदिर ही बालवाडी चालविली जाते. त्यात सुध्दा लाखो रुपयांचा घोटाळा झालेला आहे असा आरोप शिक्षण मंत्र्यांसमोर सुध्दा करण्यात आलेला आहे.
संस्थेने नंदीग्राम सोसायटीमधील काही जमीन केतन नागडाच्या सांगण्यावरून खरेदी केली आहे. त्यासाठी माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांकडून पैसे घेण्यात आले आहेत. हे पैसे शिक्षकांनी बॅंकांकडून कर्ज घेवून दिले आहेत. त्या रक्कमेवरील व्याज मागील 16 महिन्यापासून संस्था रोखीने शिक्षकांना देत आहे. या व्यवहारात सुध्दा जवळपास दीड कोटी रुपयांचा फटका संस्थेला बसला आहे.
या संस्थेचे एकूण 1100 सदस्य आहेत. अशा पध्दतीचा चुकीचा कारभार करणारा माणुस केतन नागडा कसा निवडूण येतो याचा शोध घेतला असता काही गुजराथी समाज बांधवांनी सांगितले की, या संस्थेमध्ये भानुशाही, पटेल, कच्छ पटेल, जैन असे वेगवेगळे लोक आहेत. या पैकी काही जणांची कामे मोठी आहेत आणि त्या मोठ्या कामांमध्ये केतन नागडा स्वत:त्यांना त्रास आणतो आणि आलेला त्रास प्रशासनिक अधिकाऱ्यांशी जोळणी करून घेवून तोच मिटवतो. म्हणून अशी सर्व मंडळी त्याला मतदान करतात आणि म्हणून तो निवडूण आला आहे. एकंदरीतच उपधर्मदाय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयानंतर तरी आता खरे तर गुजराथी शिक्षण संस्थेचे आर्थिक व्यवहार उपधर्मदाय आयुक्तांनी प्रशासकाच्या हातात द्यायला हवे. कारण कायदेशीररित्या कोणत्याही अधिकार नसतांना दाखल करण्यात आलेले हे चेंज रिपोर्ट उपधर्मदायक आयुक्तांनी रद्द ठरविले आहेत. एकूणच शिक्षणाच्या नावाखाली या संस्थेमध्ये सन 2018 पासून सुरू झालेला गोंधळ एवढा मोठा आहे की, ते सर्व लिहिले तर 50-100 वेगवेगळ्या बातम्या लिहाव्या लागतील. उप धर्मदाय आयुक्त्यांच्या निर्णयाने गुजराथी समाजातील बरीच मंडळी आनंद व्यक्त करत आहे.
सन 2018 पासून गुजराथी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदावर केतन नागडाचा बेकायदेशीर ताबा
