नांदेड,(प्रतिनिधी)-भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी सकाळी सात वाजल्यापासून सर्वत्र मतदानाला सुरुवात झाली आहे मतदान शांततेत आहे काही ठिकाणी मतदारांचे स्वागत करण्यात आले. भारताच्या 16 व्या लोकसभेसाठी सकाळी सात वाजण्याच्या अगोदरच नांदेड जिल्ह्यातील लोकांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या होत्या. मतदान केंद्राधिकारी यांनी बरोबर सात वाजता पहिल्या मतदाराला मतदान केंद्रात घेतले आणि मतदानाची सुरुवात झाली. वजीराबाद भागातील सखी मतदान केंद्रावर मतदारांना पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले आणि नंतर त्यांनी मतदान केले उन्हाचा तडाका पाहता काही लोकांनी सकाळपासूनच आपल्या मतदान केंद्राकडे जाण्यास सुरुवात केली आहे. हळूहळू मतदान वाढेल अशी अपेक्षा आहे. Kanthak Suryatal Post Views: 950 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation मतदान साहित्यांसह पोलिंग पार्ट्या मतदान केंद्राकडे रवाना पोलीस दलावर जीवघेणा हल्ला करणाऱ्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि 30 हजार रुपये रोखदंड