नांदेड:- नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत संपूर्णता अभियानात आकांक्षित किनवट तालुक्याने उल्लेखनीय काम केल्याबद्दल आयआयएम, नागपूर येथे राज्यस्तरीय संपूर्णता अभियान सन्मान समारोह सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांचा पदक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मुख्य सचिव राजेश कुमार, अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा आणि आकांक्षित किनवट तालुक्याचे समन्व्यक पांडुरंग मामीडवार यांची उपस्थिती होती.
