नांदेड –महापालिकेने जनतेच्या पैशाची उधळपट्टी तात्काळ थांबावी अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे केली.
नांदेडकर दरवर्षी करोडो रुपये कर नांदेड महापालिका कडे जमा करतात. जमा झालेला पैसा गुत्तेदारांना खुश करण्यासाठी मनपा उधळपट्टी करत असून नांदेड शहरातील कचरा उचलण्याचे दरवर्षीचे टेंडर 100 कोटीचे असते. यावर्षीचे टेंडर 100 कोटीचे टेंडर 200 कोटी केले. नांदेड शहरात चमत्कार होऊन नांदेड शहराची लोकसंख्या एका वर्षात दुप्पट झाली नाही. नांदेड 2 सिटी नवीन निर्माण झाले नाही. तरीही 100 कोटीचे कचरा उचलण्याचे टेंडर 200 कोटीला काढले. कोणाला खुश करण्यासाठी कशासाठी काढले महापालकेने याचे स्पष्टीकरण करावे. टेंडर काढल्यानंतर शहरातील कचरा जशास तसे आहे. ठिकठिकाणी घाण. कुठे डुकरे पडलेले.कुठे कुत्री मेलेले अशी बकाळा अवस्था मुख्य रस्ता सोडून गल्लीबोळात झाली असून केवळ गुत्तेदारांना खुश करण्यासाठी मनपाने चक शंभर कोटीचे टेंडर 200 कोटी ला काढून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे असा गंभीर आरोप महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केले. मनपाने ज्या एजन्सीला शंभर कोटीची टेंडर 200 कोटी ला दिली त्या एजन्सीने अद्यापही मनुष्यबळ. यंत्रसामग्री न वाढविता वेळ काढू पणा करून नांदेडकरांच्या पैशावर डल्ला मारत आहे. एकंदरीत प्रशासकीय राज मध्ये मनपा मध्ये सावळा गोंधळ चालू असून.विकास कामात प्रगती झिरो. गल्ली बोळातील रस्त्यावर खड्डेच खड्डे. ठिकठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी. उशाला नदी असताना सुद्धा चार..चार पाच पाच दिवसाला एक वेळेस पाणीपुरवठा. मूलभूत सुविधांचा नांदेडकरांना अभाव असून मनपाने जनतेच्या पैशाची सदुपयोग करावा. गुत्तेदारांना खुश करण्यासाठी महापालिकेने जनतेच्या पैशाची उधळपट्टी करू नये अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख प्रकाश मारावार यांनी केली..
