नांदेड(प्रतिनिधी)-लोकशाही, साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीच्या अनुशंगाने नांदेडकरांनी त्यांना नवीन मोंढा परिसरात असणाऱ्या अण्णाभाऊ साठे चौकातील पुर्णाकृती पुतळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह अनेकांनी विनम्र अभिवादन केले.
लोकशाही शाहीर अण्णाभाऊसाठे यांची 1 ऑगस्ट 105 वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली. नांदेड शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, यासह विविध समाज उपयोगी कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना विनम्र अभिवान करण्यात आले. नांदेड शहरातील लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खा.डॉ.अजित गोपछडे, खा.प्रा.रविंद्र चव्हाण, आ.बालाजी कल्याणकर, आ.आनंदराव बोंढारकर, आ.प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह असंख्य मान्यवरांनी डॉ.अण्णाभाऊ साठे अनुयायांनी त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
नांदेड शहरातील विविध भागातून त्यांच्या तेलचित्रा व विविध देखाव्यासह मिरवणुकाही काढण्यात आल्या. या सर्व मिरवणूका सायंकाळी उशीरापर्यंत शांततेत अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून समाप्त करण्यात आल्या. यावेळी शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्तही करण्यात आला होता.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना नांदेडकरांनी केले अभिवादन
