शासकीय वाळू डेपोतून गरजू ग्राहकास, घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध  

नांदेड: जिल्ह्यातील घरकुल लाभार्थी व खाजगी ग्राहकांना 1 ऑगस्ट 2025 पासून आपल्या जवळच्या वाळू डेपोमधून वाळू उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्यासाठी संबंधीत गरजु ग्राहकांना ऑनलाईनद्वारे महाखनिज प्रणालीवर सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कालावधीत (सार्वजनिक सुट्टी वगळून) वाळू बुकिंग करुन बुकिंग केलेल्या दिनांकापासून 7 दिवसाच्या आत वाळू डेपोतून वाळू उचल करणे बंधनकारक राहणार आहे.

त्यामुळे ज्या ग्राहकांना वाळूची आवश्यकता आहे त्या ग्राहकांनी शासनाचे महाखनिज प्रणालीवर mahakhanij.maharashtra.gov.in ऑनलाईन बुकिंग करुन वाळू उचल करावी, असे प्रशासनाने जाहीर केले आहे. याबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी नांदेड यांच्या अधिकृत संकेतस्थळ nanded.gov.in वर प्रसिद्ध केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!