डॉ. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचा जन्म एका उपेक्षित कुटुंबात गावकुसाबाहेरील ज्या जातीवर येथील समाज व्यवस्थेने अनेक बंधने लादून आपण माणसे आहोत. आम्हालाही जीवन जगण्याचा अधिकार आहे याची जाणीवही होवू दिली नाही. ज्यांचे जीवन म्हणजे अंधकार, अत्याचार, शोषण, गुलाम, लाचारी इत्यादीने ग्रासले आहे अशा व्यवस्थेत 1ऑगस्ट 1920 . रोजी झाला. त्यांच्या आई वडीलांना नेहमी वाटायचे आपल्या जीवनाला कोणताच अर्थ नाही. अशी वेळआपल्या मुलांवर येवू नये म्हणून अण्णा भाऊंना म्हणजेच तुकाराम यांना शाळेत पाठविण्याचा निर्णय घेतला. व शाळेत प्रवेश दिला पण ज्या माणसांना जीवनच जगण्याचा अधिकार येथील व्यवस्थेने नाकारला होता तर शाळेत प्रवेश करून शिक्षण घेण्याचा अधिकार दुरच राहिला याची जाणीव शाळेत गेल्यावर झाली. तेव्हा अण्णा भाऊ साठेनी तेव्हांच आपल्या मनाशी ठाण बांधले की आपला या शाळेत निभाव लागणार नाही म्हणून आपण यापुढे शाळेत प्रवेश करायचाच नाही. परंतु कसल्याही परिस्थितीत शिक्षण आत्मसात करून या व्यवस्थेला तडे दिल्या शिवाय शांत बसायचेच नाही. हे ठरवून शाळेच्या बाहेर पडले.
तुकारामवर शाळेत ओढावलेला प्रसंग आठवून वडील भाऊराव साठे, आई वालुबाई चिंताग्रस्त झाले. आता तुकारामांचे करायचे काय आपला तर जगण्याचा प्रश्न आहे आपल्या गावात व परिसरात कसल्याच प्रकारचे हाताला काम नाही म्हणून भाऊराव साठेनी मनोमन ठरवले, मुंबईला गेल्याशिवाय हाताला काम मिळणार नाही व काम केल्याशिवाय आपल्या कुटुंबाचा अन्नपाणयाचा प्रश्न सुटणार नाही म्हणून भाऊराव साठेनी कुटुंबासमवेत पायी मुंबई गाठली. मुंबईला गेल्यानंतर वडीलासोबतच तुकारामलाही काम मिळाले मुंबई च्या गल्ली बोळातून फिरत असतानाच अक्षराची व तेथील परिस्थितीची ओळख करून घेतली. साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी गरीब श्रीमंत, कामगार भांडवलदार, शुद्र स्वर्ण इत्यादी समाजात वर्ग कशामुळे निर्माण झाले कोण कोणावर अन्याय, अत्याचार, शोषण करीत आहेत यावर सखोल चिंतन केले तेव्हा त्यांना समजले येथील व्यवस्थेनेच अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली तेव्हा त्यांना प्राप्त झालेल्या ज्ञानाच्या साहाय्याने लेखन करण्यास सुरुवात केले व अनेक ठिकाणी गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन भांडवलदारांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी कामगारांना संघटित करण्याचे कार्य हाती घेतले.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेनी व्यवस्थेला उघडे पाडण्यासाठी अनेक वास्तव कथा, कांदबरया,वगनाट्ये, पोवाडे, लावनया , प्रवास वर्णन लेखन करून समाज जागरूक करण्याचे परिवर्तन वादी असे महान कार्य केले उदा. फकिरा कादंबरीच्या माध्यमातून सामान्य माणूस परिस्थितीने गरीब असला तरी स्वाभिमान कधीही गहाण ठेवत नाही, स्वतः जवळ काहीही नसले तरी इतरांना संकटकाळात सहकार्य करण्याची त्याची जन्मजातच परिवर्तनवादी विचाराने तो प्रेरित असतो अशा या महान कांदबरीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखनीस सन्मानपूर्वक अर्पण केले आहेत, कोंबडी चोर या कथेतून भारत देशाला परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळाले पण येथील व्यवस्थेने शोषित वर्गाला मात्र बंधनातच अडकून ठेवले आहे असे विचार मांडले आहेत, माकडीचा माळ यातून येथील अनेक व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे याचा इतरांनी गैरफायदा घेऊन स्वतः ला श्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या वर्गाकडून त्यांच्यावर वेगवेगळ्या पध्दतीने अन्याय, अत्याचार करून त्यांच्या इभ्रतीचे लचके तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत, निखारा या कथासंग्रहातून अज्ञानामुळे बहुजन समाजातील शरीराने बलशाली असलेली माणसे सुध्दा कशी आपली शकती व्यर्थ घालवतात व सर्वसामान्य स्त्रिया अन्यायाला निर्भीडपणे कशा सामोरे जातात हे सांगीतले आहेत. अशा अनेक क्षेत्रात सर्व सामान्य माणूस कशा पद्धतीने भरडला जातो याबद्दल आपल्या साहित्यातून जगासमोर मांडून सत्यबाहेर आणायचा प्रयत्न केले आहेत.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विज्ञानवादी साहित्यीक होते. दैववादी विचार त्यांनी कधीच मांडले नाहीत माणसाला समोर ठेवून वास्तवात जीवन जगण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या साहित्यात कल्पकतेला कधीच थारा दिला नाही तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णा भाऊ साठे चे खूप मोठे योगदान आहे पण व्यवस्थेने त्यांचा इतिहास अंधारात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी आपले साहित्य सातासमुद्रापलिकडे नेले व जगानेही साहित्यरत्न अण्णा भाऊ साठेच्या साहित्याला स्विकारून अनेक भाषेत भाषांतर झाले आहे रशियात जावून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव केलेला आहे व रशियातील जीवनपद्धतीचा अनुभव घेवून अभ्यास करून बहुजनांना जागे करण्याचा प्रयत्न केले आहेत व शेवटी सर्व सामान्य माणसाला परिवर्तन स्वीकारायचे असेल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारा शिवाय पर्याय नाही म्हणून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे म्हणतात.
जग बदल घालूनी घाव, सांगूनी गेले मज भिमराव
–वाघमारे टि. एम.
शेळगांव गौरी ता. नायगाव जि नांदेड
मोबाईल क्रमांक 9975129775
