नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांनी काल रेल्वे स्थानकाच्या परिसरातून मुलीचे अपहरण करणाऱ्या दोन आरोपींपैकी एक वयस्क असलेल्या मोहम्मद खाजा मोहम्मद अयान रा.इकबालनगर, नांदेड याची न्यायालसमोरून ते संपुर्ण रेल्वे स्थानक परिसरात धिंड काढली. ज्या शेकडो डोळ्यांनी कालचे चित्र पाहिले होते. त्यांनी आजचेही पाहिले असतील. म्हणजे पोलीसांनी पोलीसांचे काम केलेले आहे. पण समाजाने आपले सुध्दा काम करायला हवे. विशेष म्हणजे बिहारमध्ये सुध्दा कधी अशी आरोपीची धिंड काढली जात नसेल. दोन वेळेस पोलीस निरिक्षक ओमकांत चिंचोळकर यांनी अशी धिंड काढली आणि आज वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम यांनीही आरोपीची धिंड काढली.
प्रश्न आरोपीच्या धिंड काढण्याचाही नाही. प्रश्न आमच्या समाजात काय चालते, आम्ही का चालू देतो, काय आम्ही न चालू द्यावे, कोणते कृत्य योग्य, कोणते कृत्य अयोग्य हे आम्ही ठरवायला हवे. गांधीजींच्या तिन माकडांप्रमाणे वाईट पाहु नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका. या मार्गदर्शनाला मानले तरी आज वाईट पाहतांना वाईट रोखण्याची वेळ आली आहे. कारण गांधीजींनी ज्यावेळेस देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले, त्यासाठी लढा दिला, त्यावेळेसच्या परिस्थितीप्रमाणे त्यांनी त्या तिन सुचना केल्या असतील. आज आमच्या मते वाईट पाहु नका तर त्याचा विरोध करा, वाईट बोलू नका याला आम्ही तसेच ठेवतो आणि वाईट ऐकण्यासाठी आमच्या मते वाईट बोलणाऱ्याची जिभ कापून टाका अशी आजची परिस्थिती आहे.
वजिराबादचे पोलीस निरिक्षक परमेश्र्वर कदम,पोलीस उपनिरिक्षक सुनिल बुलंगे, पोलीस अंमलदार साखरे, गवानकर, यादव आणि काही गृहरक्षक दलाचे जवान यांनी काढलेली या आरोपीची धिंड योग्यच होती. कारण जनतेला पण यातून दिसेल की, जनतेने काही केले नाही तरी आम्ही केले असे पोलीसांनी दाखवून दिले आहे. याबद्दल वजिराबाद पोलीसांचे कौतुक करायला हवे.
युवतीला पळवणाऱ्या युवकाची वजिराबाद पोलीसांनी काढली धिंड
