नांदेड(प्रतिनिधी)-संपूर्ण कुटूंब घरात झोपले असतांना सुध्दा चोरट्याने त्या घरात प्रवेश करून अलमारी तोडून 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार महाविरनगर सिडको येथे घडला आहे.
शिवकांत उमाकांत भुसाटे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 26 जुलै रोजी रात्री 9 ते 27 जुलैच्या सकाळी 6.30 वाजेदरम्यान ते आपल्या शयन कक्षात झोपले असतांना कोणी तरी चोरट्याने घरात प्रवेश करून किचनमध्ये ठेवलेल्या लोखंडी अलमारीचे लॉकर तोडून त्यातून सोन्याचे 60 हजार रुपये किंमतीचे दागिणे चोरून नेले आहे. न ांदेड ग्रामीण पोलीसांनी हा प्रकार गुन्हा क्रमांक 715/2025 नुसार नोंदवला असून पोलीस अंमलदार जुनकुट अधिक तपास करीत आहेत.
महाविनगर-सिडकोमध्ये 60 हजारांची चोरी
