नांदेड(प्रतिनिधी)-ध्वनीमापक यंत्रण घेवून आप-आपल्या पोलीस घटकातील भोंगे तपासावेत आणि त्या संबंधाने योग्य कायदेशीर कार्यवाही करावी असे आदेश पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी जारी केले आहे.
हा आदेश जारी करतांना पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी उच्च न्यायालयातील फौजदारी रिट याचिका क्रमांक 2729/2021 चा उल्लेख केला. ज्यामुळे लाऊड स्पिकर अर्थात भोंगे यामुळे होणारे ध्वनीप्रदुषण या संदर्भाने मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. तरी पण राज्यात अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने भोेंगे ज्यांची परवानगी सुध्दा आहे ते सुध्दा ध्वनीप्रदुषणाचे उल्लंघन करतांना निदर्शनास आले आहे. म्हणून राज्यभरातील पोलीस घटकप्रमुखांनी या भोंग्यांवर कार्यवाही करावी आणि प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विशेष पोलीस महानिरिक्षक (कायदा व सुव्यवस्था) महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठवायचा सुध्दा आहे.
ध्वनीप्रदुषणाचे वर्गीकरण असे आहे की, औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 डेसीबल आणि रात्री 70 डेसीबल. वाणिज्य क्षेत्रात दिवसा 65 डेसीबल आणि रात्री 55 डेसीबल, निवासी क्षेत्रात दिवसा 55 डेसीबल आणि रात्री 45 डेसीबल, शांतता क्षेत्रात दिवसा 50 डेसीबल आणि रात्री 40 डेसीबल वाजणारे भोंगे सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंतच वाजतील घटकप्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीतील अधिकाऱ्यांना व अंमलदारांना याच्या सुचना कराव्यात आणि आदेशामध्येक विहित केलेली कायदेशीर कार्यवाही कार्यवाही करावी.
वाचकांच्या सोयीसाठी पोलीस महासंचालकांचा आदेश पीडीएफ संचिकेत बातमीसह जोडत आहोत.
सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत वाजणाऱ्या भोंग्यांवर डेसीबल तपासून कार्यवाही होणार
