“कर्दनकाळ” शहाजी उमापांचा दुसऱ्या वर्षात प्रवेश;मागील ३६५ दिवसांचा प्रामाणिक लेखाजोखा!

महाराष्ट्र पोलीस दलातील खर्‍या अर्थाने कर्दनकाळ म्हणून ओळखले जाणारे शहाजी उमाप यांच्या कार्यकाळातील दुसऱ्या वर्षाचा पहिला दिवस उद्या सुरू होतो आहे.

महाराष्ट्रात नव्याने आलेला प्रत्येक आयपीएस अधिकारीदेखील उमाप यांचं नाव ऐकताच “चंद्रावरचा डाग” ओळखावा, तसं त्यांना ओळखतात. जुने अधिकारी तर त्यांचं नाव घेताच “धडधडीत आठवण” ठेवतात. पोलिसी जीवनात “पोलीस” या शब्दाला त्यांनी नेहमी ‘देवाचा दर्जा’ दिला आहे.मागील वर्षी 25 जुलै 2024 रोजी त्यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्राचा कार्यभार स्विकारला. आज त्यांचे एक वर्ष पुर्ण होत आहे. शहाजी उमाप आज पोलीस उपमहानिरिक्षक या पदावर कार्यरत आहेत. शासनाने नांदेड पोलीस परिक्षेत्र कार्यालयातील पदाचा दर्जा पदावनत करून त्यांना नियुक्ती दिली आहे. यावरूनच त्यांच्यात असलेल्या शक्तीला समजता येते. उद्या 25 जुलै 2025 पासून त्यांच्या पोलीस उपमहानिरिक्षक नांदेड पोलीस परिक्षेत्र या पदावर दुसऱ्या वर्षाचा पहिला दिवस आहे. म्हणून या मागील 365 दिवसांमध्ये त्यांनी काय केले. हे मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.

ते वारंवार सांगतात की, “पोलीस हा रडणाऱ्या जनतेचा पहिला आधार असतो, आणि शेवटचा भिंतही!” त्यामुळेच त्यांच्याकडून एक बाणा कायम दिसून आला। “दूधाचा दूध आणि पाण्याचं पाणी” करण्याचा. कोणी अधिकारी चुकला तर क्षमा नाही, आणि चांगलं काम केलं तर “शाब्बासकीची थाप” लगेचच मिळते.

नांदेड पोलीस परिक्षेत्रामध्ये नांदेड-हिंगोली-परभणी आणि लातूर हे चार जिल्हे येतात. याचा अर्थ चार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक, अपर पोलीस अधिक्षक, अनेक पोलीस उपअधिक्षक, अनेक पोलीस निरिक्षक असा मोठा पोलीस ताफा त्यांच्याकडे आहे. त्यांना ते समाजाच्या भल्यासाठी काम करण्याचे शिक्षण देत असतात. आलेल्या अर्जाची निर्गती कशी करावी, त्यात काय मुद्दे हवे, ते कसे लिहावे, फिर्यादीचे समाधान कसे होईल, दुर्जनांचे निर्दालन कसे होईल. याशिवाय दुसरी कल्पना त्यांनी कधीच केली नाही. ही कल्पना प्रत्यक्षात आणत असतांना त्यासाठी किती झटावे लागते आणि काय करावे लागते. याची पुर्णत: जाणिव ठेवून ते काम करत आहेत. सध्या तर छत्रपती संभाजीनगर पोलीस परिक्षेत्राचा अतिरिक्त भार सुध्दा ते सांभाळत आहेत.

नांदेड जिल्ह्यात “वाघाचं पाऊल”, गुन्हेगारीला चाप 

२५ जुलै २०२४ रोजी त्यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्राचा कार्यभार स्वीकारला. आज एक वर्ष पूर्ण होतं आहे. “पाय रोवले आणि कर्तृत्व दाखवले” असं म्हणावं लागेल.नांदेड, परभणी, हिंगोली, आणि लातूर या चार जिल्ह्यांचा भार त्यांच्यावर आहे. त्यांच्याकडे अधिकारीवर्ग आणि पोलिसांची मोठी टीम आहे. पण “मुळापासून उखडायचं” हे त्यांचं धोरण मग गुन्हेगार असो की अनागोंदी कारभार.

“खालून वरपर्यंत झाडा; तरच गळफास सुटतो!”

नोकरीत आलेल्या प्रत्येक अर्जाची “सुईच्या अग्रावर नाचतं तितकं बारकाईने” त्यांनी पाहणी केली. कुठे अर्जाचा निर्णय अडकतो, तक्रारदाराचं समाधान कसं होईल, वाळू माफियांना आळा कसा बसेल याचा ते नेहमी शोध घेतात.“अंग झटावं लागलं तरी हरकत नाही, पण अन्यायाचं सावट राहायला नको” हे त्यांच्या कामाचं तत्त्व.

“काडी हलली तरी आवाज त्यांच्या कानावर”

नांदेड, परभणी आणि लातूरमध्ये त्यांनी पूर्वीही काम केलं असल्याने, तिथे “एकही पान हललं तरी” त्यांना समजतं.पोलीस दलाच्या कारभारात त्यांनी पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु, “एक हात कापला तरी दुसऱ्याने तलवार उचलायचीच!” अशा प्रकारे काही अधिकाऱ्यांचे वर्तन अजूनही चौकशीस पात्र ठरतं.

“थाळीतल्या भातावरून हंडी ओळखावी”

आज जरी उमाप यांच्या नेतृत्वाखाली मोठा बदल घडत असला, तरी त्यांच्या माघारी  काही अधिकारी “डाव्या हाताने उजवीकडचं काम” करत असल्याचं चित्र आहे.वाळूच्या ट्रक तपासणीपासून ते जुगार छाप्यातील आर्थिक व्यवहारांपर्यंत अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत.“सावध रहा, पुढचं पाऊल मागे जाईल”, असा इशारा आता आवश्यक ठरत आहे.

“उंबरठे झिजले, पण अन्याय काही कमी झाला नाही”

बदल्यांच्या बाबतीत अनेक पोलीस अंमलदारांनी आपले उंबरठे झिजवले, पण नशिबात काहीच नव्हतं. काहींना आपलं घर, आजारी बालक-जेष्ट, मुलांचं शिक्षण हे सगळं गमवावं लागलं.“ज्याचं जळतं त्यालाच ताप कळतो”, पण काही अधिकारी त्यावर “डोकं झाकून झोपतात”.

“नांदेड विकला गेला असता, जर शहाजी राजे नसते!”

नांदेड पोलीस परिक्षेत्रात शहाजी उमाप नसते, तर आज नांदेड “हातातोंडाशी आलेलं घास गमावलेला” असता. त्यांच्या आगमनामुळे जिल्ह्याला “कडेलोटापासून वाचवणारा आधारस्तंभ” मिळाला.

“भ्रष्ट अधिकाऱ्यांना सोडा, न्यायाच्या वाटेवरच ठसा राहतो”

राजकारणी, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून काही निर्णय होतात. पण शहाजी उमाप “कणीचा पक्के” असल्याने अनेक वेळा त्यांनी “न थांबता लढा दिला” आहे.त्यांनी त्यांच्या कामगिरीतून हे दाखवून दिलं आहे की, “चांगुलपणा अदृश्य असतो, पण त्याचा प्रभाव खोलवर असतो.”

शेवटची इच्छा दणकट हातांचे आशीर्वाद देणारा राजा असा असावा!

आपल्या जीवनात कधीच पोलीस या शब्दावर डाग लागणार नाही याची सर्वात जास्त चिंता त्यांना असते. त्यासाठी ते काम करतच असतात. नांदेड पोलीस परिक्षेत्राचा कार्यभार सांभाळल्यानंतर कोट्यावधी रुपयांची अवैध दारु, अवैध वाळू जप्त करण्यात आली. ज्यामुळे शासनाचा महसुल वाढला. चोरी करून दारु विक्री आणि वाळू विक्री बऱ्याच अर्थाने कमी झाली. सोबतच जुगार अड्डे, गुटखा विक्रेते यांनी तर दररोज जागा बदलून बदलून आपले काम काज सुरू केले आणि बऱ्याच अंशी त्यांच्यावरही वचक आला. परभणी-नांदेड आणि लातूर या तिन ठिकाणी त्यांनी आपल्या पोलीस जीवनाच्या सुरूवातीच्या कालखंडात कार्यरत असल्यामुळे या तिन जिल्ह्यात तर त्यांचे खबरी एवढे आहेत की, त्याची कल्पना सुध्दा करता येत नाही. काडी जरी कोठे पडली तरी त्या काडीचा आवाज शहाजी उमाप ऐकतात. विभाग प्रमुख किंबहुना राजा कसा असावा हे शिकायचे असेल तर त्या विद्यार्थ्याने शहाजी उमापांच्या कामाकाजाचा अभ्यास केला पाहिजे. त्यांच्या दैनंदिन जीवनाला जवळून पाहिले पाहिजे मग हा अभ्यास करणारा व्यक्ती सुध्दा पुढे मोठेच काम करेल.
         शहाजी उमापांच्या कर्दनकाळ कामगिरीवर लिहित असतांना हे पण लिहावेच लागेल की, तुमच्या माघारी तुमचे अधिकारी आणि पोलीस अंमलदार काय-काय करतात. कधी पाहिले काय शहाजी राजे वाळू चोरीच्या जेवढ्या ट्रक, टिपर, हायवा, ट्रॅक्टर पकडले. त्यांची तपासणी तुमच्या अधिकाऱ्यांनी आरटीओ विभागाकडून करून घेतली काय? त्यात त्या गाड्यांचे प्रदुषण प्रमाणपत्र, फिटनेस प्रमाणपत्र, कर तपासण्यात आले काय ? आणि ते तपासले असतील तर त्याच्यात किती दंड लागला आणि का नाही तपासले याची माहिती आपण कधी घेतली काय? एखादा जुगाराचा छापा टाकला असेल तर त्या ठिकाणी असलेली रक्कम किती होती आणि दाखवली किती याची पडताळणी कधी केली काय? तुमच्या चार जिल्ह्यांचे पोलीस अधिक्षक किती-किती मोदक प्रसाद घेवून नियुक्त्या देत आहेत. तुमचे पोलीस अधिक्षक एकदा केलेल्या पोलीस अंमलदारांच्या बदल्या परत परत का बदलून देत आहेत आणि देत असतील तर ज्यांचे अर्ज आहेत त्यांना बदली न देवून का अन्याय होत आहे. काही जणांना नको असते दुर जाणे कारण त्यांचे कुटूंब येथे असते, आई-वडील अजारी असतात. लेकर शिकत असतात. म्हणून त्यांची इच्छा असते. पण त्यांना तुमचे पोलीस अधिक्षक मदत करतात काय? यामुळे अनेक पोलीस अंमलदार आपले उंबरठे सुध्दा झिजवून गेले आहेत. कधी त्या उंबरठ्यांना पाहिले काय ? की किती लोकांनी या उंबरठ्यावर आपले डोके टेकवले आहे. ते उंबरठे वजनाने झिजून जातील. आपल्याकडे पाहण्याचा दृष्टीकोण, आपल्याकडे मागणी करण्याची भावना यासाठीच आहे की, मालक आम्हाला देवू शकतो. तुमचे काही अधिकारी, काही घाणेरड्या लोकांचे ऐकून आपले काम-काज चालवितात. ते घाणेरडे लोक तुमच्याच पोलीसांना त्रास देतात. याचा विचार कधी करा शहाजी राजे. म्हणजे तुम्हाला पोलीस या शब्दावर जो अभिमान आहे तो कायम होण्यासाठी तो ठसा ठरेल.
           आमच्या मते आमचा अभ्यास हिंगोली-लातूर आणि परभणी या जिल्ह्यांचा जास्त नाही. या जिल्ह्याबद्दलची जी माहिती आमच्याकडे प्राप्त होते. त्या पध्दतीने आम्ही त्याच्या बातम्या करत असतो. परंतू नांदेड जिल्हा हाआमच्या पाचवीला पुजलेला आहे. त्याबद्दल एकच वाक्य म्हणावेसे वाटते की, शहाजी राजे आपण नांदेड पोलीस परिक्षेत्रात आला नसतात तर नांदेड जिल्हा आजपर्यंत विक्री झाला असता. त्यासाठी नांदेड जिल्ह्याच्या नागरीकांवर आपले उपकारच आहेत. एकूणच मागील 365 दिवसांचा लेखा-जोखा मांडण्याचा हा प्रयत्न आहे आणि कर्दनकाळांना दुसऱ्या वर्षाचा कार्यकाळ अत्यंत उत्कृष्ट पुर्ण करतांना तुमचे गरीबांचे आश्रु पुसणारे हात सदैव दणकट राहावे ही परमेश्र्वराकडे प्रार्थना…

✍️ – कंथक सूर्यतळ | संपादक | वास्तव न्यूज लाईव्ह

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!