नांदेड,(प्रतिनिधी)-19 जुलै 2025 रोजी रात्री नऊ तीस वाजे सुमारास शारदानगर येथे एका महिलेच्या गळ्यातील 60 हजार रुपये किमतीचे सोन्याची चैन दोन चोरट्यांनी बळजबरीने तोडून नेली आहे.
पुष्पाबाई साहेबराव गोपरे या शारदानगर मधील महिला 19 जुलै रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पायी वाक करत असताना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन बळजबरीने चोरून नेली आहे. विमानतळ पोलिसांनी या तक्रारीनुसार गुन्हा 280/ 2025 दाखल केला आहे तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करणार आहेत.
