विकसित महाराष्ट्र 2047 सर्वेक्षणासाठी नागरीकांना सहभाग घेण्याचे आवाहन

नांदेड:- भारत सरकारच्या विकसित भारत-2047 या दूरदृष्टी कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने विकसित महाराष्ट्र-2047 ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विविध खात्यांचे मंत्री यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्ह्यांमध्ये जनतेचा सहभाग घेऊन व्यापक चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. जनतेच्या सूचना, गरजा व अपेक्षा लक्षात घेऊन सदर व्हिजन डॉक्यूमेंट Vision Document तयार केले जाणार आहे. या सर्वेक्षणात नांदेड जिल्हयातील सर्व नागरीकांनी https://wa.link/o93s9m या लिंकवर आपले मत नोंदवावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी आवाहन केले आहे.

 

विकसित महाराष्ट्र-2047 करिता व्हिजन डॉक्यूमेंट Vision Document तयार करण्याच्या अनुषंगाने नियोजन विभागाच्या 2 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये दिनांक 6 मे ते 2 ऑक्टोबर 2025 अशा 150 दिवसांच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रासाठी Vision Document तयार केला जात आहे. ज्यामध्ये कृषी व सलग्न क्षेत्र, उद्योग व सेवा, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, प्रशासन व पर्यावरणीय इ. क्षेत्रांच्या क्षेत्रनिहाय अभ्यास समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!