नांदेड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्ष पदावर अमित राज ठाकरे यांनी दिपक स्वामी यांची नियुक्ती केली असून नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याचा प्रभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांनी जारी केलेल्या पत्रानुसार राज ठाकरे यांनी आजवर मांडलेले विचार लक्षात ठेवून दिपक स्वामी यांच्या पुढील वाटचालीला शुभकामना दिल्या आहेत. विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच शैक्षणिक संस्थांना भेडसावणाऱ्या असंख्य प्रश्नांना समोरे जावूून सदैव मदतीची भावना आपल्यात जागृत ठेवा अशा शुभकामना दिल्या आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेत दिपक स्वामी यांना उपाध्यक्ष
