नांदेड(प्रतिनिधी )–शहरातील दीपनगर परिसरातील सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम हे भर दिवसा करणे ऐवजी रात्रीच्या वेळेला केले जात आहे.त्यामुळे या परिसरातून इजा करणाऱ्या पादचाऱ्यांना रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार देखील होत असून या कामाचा संबंधित विभाग ज्यांच्याकडे आहे असे या विभागाचे अभियंता पाटील तसेच या विभागाचे शहर अभियंता दिलीप टाकळीकर यांना अभय देणारे आयुक्त महेश डोईफोडे यासह सर्व संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर प्रशासनाने योग्य ती कार्यवाही तात्काळ करावी. जेणेकरून दीपनगर परिसरातील नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही.
अशा पद्धतीचे योग्य रीतीने काम न करणाऱ्या कंत्राटदारास कोणत्या अधिकाऱ्यांनी ही देयके दिली.आणि कोण अशा पद्धतीने कामात भ्रष्टाचार केला आहे या संबंधित बाबींची उच्चस्तरीय चौकशी करून सामान्य नागरिकांच्या कराच्या माध्यमातून महापालिकेला जो निधी गोळा होतो या माध्यमातून ही सर्व विकास काम केली जातात. मग ती कामे चांगल्या पद्धतीने मार्गी लागावी यासाठी युवा सेनेचे नेते सचिन पाटील यांनी प्रशासनाकडे या संपूर्ण प्रकाराची चौकशी करून संबंधित भ्रष्ट अधिकारी यांच्यावर कार्यवाही करावी आणि हा रस्ताची कामे योग्य पद्धतीने पूर्ण करून नागरिकांना सोयीस्कर करून द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
