नांदेड(प्रतिनिधी)-दोन वर्षापासून सचखंड गुरूद्वारा बोर्डामध्ये डेलिवेजस्वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती देण्याचा अर्ज सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष यांना देण्यात आला आहे.
सरदार मनमितसिंघ कुंजीवाले, गुरमितसिंघ बेदी, जसपालसिंघ लांगरी, जगदीपसिंघ नंबरदार, अमरदिपसिंघ हंडी, सरबजितसिंघ होटलवाले, जसदिपसिंघ बुंगई यांनी 25 फेबु्रवारी 2025 रोजी डेलिवेजस कर्मचाऱ्यांना कायम स्वरुपी सेवेत रुजू करण्याचा अर्ज दिला होता. पण त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. म्हणून 16 जुलै 2025 रोजी पुन्हा स्मरण पत्र देण्यात आले आहे. ज्यामध्ये दोन वर्षापासून काम करणाऱ्या लोकांना काहीच फायदा मिळत नाही म्हणून त्यांना कायम स्वरुपी नियुक्ती द्यावी जेणे करून त्यांना बरेच फायदे मिळतील. गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या कर्मचाऱ्यांचे हित लक्षात घेवून आमची मागणी मान्य करावी नसता आम्हाला आंदोलन करावे लागेल आणि त्याची जबाबदारी आपल्यावर असेल असे या निवेदनात नमुद आहे.
गुरुद्वारातील डेलिवेजस कर्मचाऱ्यांना कायम करण्याची मागणी
