नांदेड(प्रतिनिधी)-एका महिलने फोन करून एका 72 वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीला सीबीआयकडून अटक करण्याची धमकी देवून त्यांच्या खात्यातील 28 लाख रुपये घेवून फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. शिवाजीनगर पोलीसंानी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
सेवानिवृत्त असलेले खंडोजी टोलाजी बायस (72) रा.रामराव पवार मार्ग श्रीनगर नांदेड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 जुलै ते 9 जुलै दरम्यान त्यांच्या मोबाईल फोनवर व्हाटसऍप व्हाईस व व्हिडीओ कॉल आले. त्यात एक महिला बोलत होती आणि मी सीबीआयची मुख्य अधिकारी आहे. तुमच्या नावाने मुंबई येथे खाते आहे. तुमचा मोबाईल बंद करा आणि माझ्या खात्यात पैसे जमा करा नाही तर सीबीआय मार्फत तुम्हाला अटक करण्यात येईल. फिर्यादी खंडोजी बायस यांनी त्या ठकबाज महिलेच्या खात्यावर 28 लाख रुपये जीएसटीद्वारे जमा केले. शिवाजीनगर पोलीसांनी ही फिर्यादी गुन्हा क्रमांक 290/2025 प्रमाणे दाखल केली आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप थडवे हे करीत आहेत.
बॅंकांच्या वतीने संदेश पाठविले जातात, तुम्हाला सीबीआय, इन्कटॅक्सच्या नावाने कॉल येईल असे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असे गुन्हे दाखल झालेल्या बातम्या जनता वाचत आहे. तरी पण अशा लोकांच्या भुलथापांना बळी पडून आपले लाखो रुपये पाण्यात टाकत आहात. आता तरी लोकांनी आलेल्या कॉलची तपासणी करावी तरच या प्रकारांवर आळा बसेल.
सीबीआयचा धाक दाखवून महिलेने केली 28 लाखांची ठकबाजी
