नांदेड(प्रतिनिधी)-भारतीय पोलीस सेवेतील पाच पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा बदल्या बदलून दिल्या आहेत. आणि राज्यसेवेतील एका पोलीस अधिकाऱ्याला नवीन पदस्थापना दिली आहे.
राज्य शासनाच्या गृहविभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या आदेशाने पाच भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांना काही दिवसांपुर्वी दिलेल्या बदल्या बदलून नवीन पदस्थापना दिल्या आहेत. या पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या 9 जुलै रोजीच झाल्या होत्या. कमलेश मिणा-सहाय्यक पोलीस अधिक्षक उपविभाग केज जि.बिड यांना समादेशक रा.रा.पो.ब.गट क्रं.13 वडसा, गडचिरोली येथे बदली देण्यात आली होती. आता त्यांना अपर पोलीस अधिक्षक हिंगोली येथे पदस्थापना देण्यात आली आहे. राहुल चव्हाण हे सहाय्यक पोलीस अधिक्षक उपविभाग पुलगाव जि.वर्धा येथे कार्यरत होते. त्यांना समादेशक रा.रा.पो.ब.गट क्रं.5 दौंड येथे नियुक्ती दिली होती. आता त्यांना पोलीस उपआयुक्त मिरा-भाईंदर-वसई-विरार येथे नवीन नियुक्ती दिली आहे. रिना जनबंधू या चंद्रपुर जिल्ह्याच्या अपर पोलीस अधिक्षक होत्या. त्यांना पोलीस उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग नागपूर येथे नियुक्ती दिली होती. ती बदलून पोलीस अधिक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येेथे बदली दिली आहे. पोलीस उपआयुक्त मध्य रेल्वे मुंबई मनोज नवल पाटील यांना पोलीस अधिक्षक पोलीस प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे नियुक्ती मिळाली होती. ती बदलून आता पोलीस उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग मुंबई येथे पाठविले आहे. नागरी हक्क संरक्षण कोल्हापूर येथील पोलीस अधिक्षक तुषार पाटील यांना पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई या पदावर नियुक्ती दिली होती. ती बदलून आता त्यांना समादेशक रा.रा.पो.बल गट क्र.5 दौंड पुणे येथे नियुक्ती दिली आहे. सोबतच मिरा-भाईंदर-वसई-विरार या पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपआयुक्त प्रकाश गायकवाड यांना पोलीस उपआयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग नागपूर येथे पाठविले आहे.
पाच आयपीएसला पुन्हा एकदा बदलून नवीन नियुक्त्या
