पद्मजासिटीमध्ये 1 लाख 75 हजारांची चोरी

नांदेड(प्रतिनिधी)-पद्मजासिटी नांदेड येथील एक घरफोडून चोरट्यांनी 1 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.
अपुर्व अंबादासराव वशिष्ट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 10 जुलै रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 14 जुलैच्या सकाळी 9 वाजेदरम्यान त्यांचे बहिण व भावजी आपल्या कुटूंबासह घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. हे घर पद्मजासिटीमध्ये आहे. चोरट्यांनी त्यांच्या घराचा कुलूपकोंडा तोडून घरातील लॉकर तोडले आणि 1 लाख रुपये रोख रक्कम आणि 75 हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे असा ऐवज चोरून नेला आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी ही घटना गुन्हा क्रमांक 672/2025 प्रमाणे नोंदवली आहे. पोलीस उपनिरिक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!