नांदेड(प्रतिनिधी)-शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या एका सेवेकाने आपली आई, पत्नी आणि दोन लेकरांसह सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड येथे आमरण उपोषण केले आहे. आज त्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे. तरी पण कोणी त्याची दखल घेतलेली दिसत नाही.
नांदेड येथे राहणारे माणिक उध्दवराव निल्लेवाड हे शिक्षण संस्थेत 2006 पासून कार्यरत आहेत. 1 मार्च 2016 रोजी संस्थेने त्यांना कायम सेवक म्हणून नियुक्ती दिली. पण शिक्षण विभाग नागपूरच्या कमिटीने त्यांच्यावर चुकीची कार्यवाही करून पगार बंद केली. मागील तीन महिन्यापासून ते कार्यरत असून त्यांना वेतन मिळत नसल्याने त्यांच्यावर आणि कुटूंबावर उपासमारीची वेळ आली आहे. शिक्षण विभागाने दखल घेवून त्यांचे बंद केलेले वेतन त्वरीत सुरू करावे अशी मागणी केली आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे . तरीपण कोणाची त्या कुटूंबाच्या उपोषणाची दखल घेतल्याचे दिसून येत नाही.
शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या सेवकाचे आई,पत्नी आणि दोन लेकरांसह आमरण उपोषण
